परभणी (प्रतिनिधी) १० ते १२ फेब्रुवारी दरम्यान मृद विज्ञान विभागातर्फे भारतीय कृषी संशोधन परिषद नवी दिल्ली पुरस्कृत तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचा समारोप करण्यात आला.

या प्रसंगी व्यासपीठ वर डॉ अनिल धमक, डॉ रामप्रसाद खंदारे, डॉ.संतोष चिक्षे,डॉ स्वाती झाडे, डॉ. सुरेश वाईकर यांची उपस्थिती होती. माननीय डॉ. इंद्र मणी, कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्या प्रेरणेतूनभा रतीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्ली आणि कृषी महाविद्यालय परभणी अंतर्गत मृद विज्ञान विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने माती परीक्षण आणि रासायनिक खतांचा वापर या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे संपन्न झाले . प्रशिक्षणार्थीना आज व्यासपीठावर उपस्थित मान्यवर यांचेकडून प्रमाण पत्र वितरण केले. याप्रसंगी डॉ. भगवान असेवार, संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता कृषी, डॉ. प्रवीण वैद्य, सहयोगी अधिष्ठाता आणि प्राचार्य, डॉ.हरिहर कौसडीकर प्रशिक्षण संचालक यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्या संदर्भात मार्गदर्शन केले.

या प्रशिक्षण शिविरात नागपूर येथील राष्ट्रीय मृद सर्वेक्षण संस्थेचे वारिष्ठ शास्त्रज्ञ डॉ रवी नाईतम , राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ चे मृद विज्ञान प्रमुख डॉ भीमराव कांबळे आणि विभागातील प्राध्यापक यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाच्या दृष्टिकोनातून आयोजित या प्रशिक्षण शिबिर सर्वानी आपले मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावरील डॉ. हरिहर कौसडीकर यांनी प्रशिक्षणार्थी याना माती परीक्षानाचे महत्व आणि त्यावर आधारित रासायनिक खतांचा वापर याविषयी मार्गदर्शन केले. माती परीक्षण प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी आवश्यक घटकांची माहिती दिली. प्रशिक्षण घेतल्याशिवाय कौशल्य विकसित होत नाही असे प्रतिपादन केले. सध्याच्या विविध शेती प्रकारात मातीच्या आरोग्याचे काय महत्त्व आहे आणि त्यामुळेच माती परीक्षण प्रयोगशाळा कशी आवश्यक आहे याविषयी सविस्तर माहिती दिली. रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी परिक्षण करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमी करण्यासाठी देखील माती परीक्षण करूनच खतांचा वापर करावा. मातीचे पुनर्जीवन, पोषण आणि सुधारणा करणे आज काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचा या प्रशिक्षणास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात राजीव गांधी कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी देखील सहभाग नोंदविला. सर्व विद्यार्थ्यानी अशा प्रकारे प्रशिक्षण शिबिर नेहमी आयोजित करण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
या शिबिरात प्रशिक्षणार्थी म्हणून पदवी, पदव्युत्तर व आचार्य पदवी च्या विद्यार्थ्यानी सहभाग घेतला. समारोप व प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. स्वाती झाडे यांनी केले. याप्रसंगी विभागातील डॉ. अनिल धमक, डॉ. सुरेश वाईकर, डॉ. महेश देशमुख, डॉ.स्वाती झाडे, डॉ. संतोष पिल्लेवाड, डॉ. स्नेहल शिलेवंत, कर्मचारी श्री भानुदास इंगोले श्री महेश देशमुख आणि पद्व्युत्तर व आचार्य पदवीचे विद्यार्थी यांची उपस्थिती होती.


