परभणी, (प्रतिनिधी) : केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले हे बुधवार, (दि. १९) रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. मुंबई येथून देवगिरी एक्स्प्रेसने सकाळी साडे सात वाजता परभणी येथे आगमन होईल. त्यानंतर सकाळी ७.४० वाजता शासकीय विश्रामगृह येथे त्यांची वेळ राखीव असेल. सकाळी ११.३० वाजता शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. यानंतर दुपारी १ वाजता सिद्धार्थनगर, पूर्णा येथील दिवंगत भीमराव लोखंडे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देतील. दुपारी १.४५ वाजता गौर, ता. पूर्णा येथील दिवंगत संतोष सावळे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देतील. दुपारी ३ वाजता ते नांदेडकडे प्रयाण करतील. *-*-*-*-*
Author: Lok Sanchar
परभणी(प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाच्या वतीने सन २०२५-२६ या वर्षासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार तसेच डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार देण्यात येणार आहेत. राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, नागरिकांना अधिक चांगल्या ग्रंथालयीन सेवा उपलब्ध व्हाव्यात तसेच वाचन संस्कृतीला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हे पुरस्कार देण्यात येतात. ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवकांचा गौरव करण्यासाठी भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांच्या नावाने ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार प्रदान करण्यात येतो. राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील अ, ब, क व ड वर्गातील…
भाजपच्या सनातनी प्रवर्तीविरोधात भीमशक्तीचे प्रतीकात्मक मुंडन व पिंडदान आंदोलन संपन्न परभणीः(प्रतिनिधी) उत्तराखंड राज्यातील हलदानी येथील रामलीला मैदानातील राष्ट्रीय कोंग्रेसचे अध्यक्ष व सर्वोच्च राज्यसभा सभाग्रहातील विरोधी पक्ष नेते मा. मलिकार्जुन खरगे यांच्या सभेनंतर त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून गोमूत्रद्वारे शुद्धिकरण करण्यात आलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी भीमशक्तीच्या वतीने प्रतीकात्मक मुंडन व सत्यशोधक यज्ञ करून आंदोलन करण्यात आले.. माजी मंत्री तथा राज्यसभा खासदार मा . चंद्रकांतजी हंडोरे यांच्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात आले आहे. समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा आणि भारतीय संविधानाच्या मूलभूत मुल्यांच्या विरोधात प्रतिगामी व सनातनी प्रवृतीचा यावेळी निषेध करण्यात आला.. सदरिल आंदोलनात भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष सतीश भिसे यांच्या नेतृत्वत अनेक कार्यकर्त्यांनी मुंडन…
परभणी (प्रतिनिधी) परभणी मेडिकल कॉलेज व आर.पी. रुग्णालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागासाठी अभिमानाची बाब म्हणजे विभागातील अत्याधुनिक मॉलिक्युलर डायग्नॉस्टिक प्रयोगशाळेला (Molecular Laboratory) NABL (National Accreditation Board for Testing and Calibration Laboratories) मानांकन प्राप्त झाले आहे. या मानांकनामुळे परभणी जिल्ह्यासह मराठवाड्यातील रुग्णांना राष्ट्रीय दर्जाच्या प्रयोगशाळा सेवा आता स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत. या प्रयोगशाळेत जीवाणूंची कल्चर व अँटिबायोटिक सेन्सिटिव्हिटी चाचणी, क्षयरोग (TB) निदान, औषध प्रतिकारक क्षयरोग (TB Drug Resistance) तपासणी, कर्करोगाशी संबंधित विविध मॉलिक्युलर चाचण्या, तसेच पूर्वी निदान करणे कठीण असलेल्या अनेक गुंतागुंतीच्या संसर्गजन्य व इतर आजारांचे अचूक निदान आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केले जात आहे. त्यामुळे यापुढे अनेक रुग्णांना पुणे, मुंबई किंवा इतर…
विशेष लेख भटकंती ची मबभारतातील वैवीध्यपूर्ण संस्कृती, इतिहास, आणी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी भारत भ्रमण करणे हा उत्तम मार्ग, अतुलनिय भारताच्या ह्या प्रवासात आपण हिमालय च्या सुंदर पर्वत रांगा पासून कन्याकुमारी च्या सागरा पर्यंत आणी राजस्थान च्या वाळवंटा पासून ईशान्य भारतातील हिरव्या गार दऱ्यांचा अनुभव घेऊ शकतो , ,भारत देश भ्रमण एकूण कालावधी 12/13 वर्ष आणी खर्च एकूण स्व कमाईचा 18 लाख रु खर्च करून पूर्ण भारत भ्रमण मी पूर्ण केले… सगळा भारताचा नकाशा म्हणलं की डोळ्या समोर दिसतो खूप मोठा विशाल आपला भारत देश, ,अतुल्य भारतातील 28 राज्य व 8 केंद्र शासित प्रदेश, अनेक शहरे, अनेक धार्मिक स्थळें, व अनेक…
परभणी (प्रतिनिधी) कर्तव्यात कसूर आणि प्रशासकीय अनियमितता प्रकरणी राज्य शासनाने परभणीचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजयकुमार पांचाळ आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश लखमावार यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. आज १३ ऑगस्ट रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार दोन्ही अधिकाऱ्यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. जिंतूर येथील एका घटनेत गर्भवती महिलेला परभणी येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, पुरेशा उपचाराअभावी संबंधित गर्भवती महिला आणि तिच्या गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात कर्तव्य बजावताना नियंत्रणीय व पर्यवेक्षकीय जबाबदारी योग्य पद्धतीने पार न पाडल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली असून,…
परभणी (प्रतिनिधी) केंद्र व राज्य सरकारच्या कामगारविरोधी, शेतकरीविरोधी व जनविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी तसेच चार कामगारविरोधी श्रमसंहिता रद्द करण्याच्या मागणीसाठी केंद्रीय कामगार संघटना संयुक्त कृती समिती व संयुक्त किसान मोर्चाच्या निर्णयानुसार परभणीत आयटकच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर “धरणे आंदोलन” करण्यात आले. या आंदोलनात अंगणवाडी कर्मचारी, आशा कर्मचारी, हमाल माथाडी कामगार, किसान सभेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या कामगारविरोधी धोरणांचा तीव्र निषेध करण्यात आला. वाढती महागाई, बेरोजगारी, कंत्राटीकरण, कामगारांच्या हक्कांवर होणारे आक्रमण, सामाजिक सुरक्षा कमी करण्याचे धोरण तसेच शेतकरी, शेतमजूर व कष्टकरी जनतेच्या प्रश्नांकडे सरकारचे होत असलेले दुर्लक्ष याविरोधात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. केंद्र सरकारने लागू…
परभणी (प्रतिनिधी) येथील वसमत रस्त्यावरील गोदावरी हॉस्पिटल व स्कॉलर्स अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष ,तथा प्रख्यात भूलतज्ज्ञ डॉ. मधुसूदन मगर यांचे आज अल्पशा आजाराने पुण्यातील खासगी रुग्णालयात दुःखद निधन झाले. दरम्यान डाॅ. मगर त्यांच्या पार्थिवावर आज, दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता परभणी येथील जिंतूर रस्त्यावरील वैकुंठधाम स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दैनिक लोकसंचार परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
परभणी,( प्रतिनिधी) : राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शासकीय वसतिगृह योजनेअंतर्गत सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 12 वी नंतर व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांनी शासनाच्या https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर दि. 7 ऑगस्ट 2026 ते दि. 31 ऑगस्ट 2026 या कालावधीत ऑनलाईन अर्ज करावेत. प्राप्त अर्जांची छाननी दि. 1 सप्टेंबर 2026 ते दि. 7 सप्टेंबर 2026 या कालावधीत करण्यात येणार आहे. गुणवत्तेनुसार पहिली निवड यादी दि. 8 सप्टेंबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. या यादीतील विद्यार्थ्यांना दि.…
परभणी,(प्रतिनिधी) : व्हॉइस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची घोषणा संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे आणि राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. नव्या कार्यकारिणीत अनुभवी व नवोदित पदाधिकार्यांचा समतोल साधत राज्यातील सर्व विभाग व जिल्ह्यांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नवनिर्वाचित कार्यकारिणीत विजय चोरडिया यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अजितदादा कुंकलोळ यांची उत्तर-दक्षिण विभागीय प्रदेशाध्यक्ष, तर नरेंद्र देशमुख यांची पूर्व-पश्चिम विभागीय प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. कार्याध्यक्षपदी मिलिंद टोके आणि महेश पांचाळ, राज्य सरचिटणीसपदी गजानन देशमुख व सचिन मोहिते, तर राज्य उपाध्यक्षपदी संगम कोटलवार, चंद्रशेखर भोयर, अभिजीत दरेकर आणि गणेश जैन यांची…

