परभणी (प्रतिनिधी) येथील कान्हेकर विद्यालय, परभणी.चे मुख्याध्यापक जयंतराव शेषराव कुलकर्णी-भांडेगावकर यांचे गुरुवारी 3 जुलै रोजी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 41 वर्ष होते त्यांच्या वर येथील वैकुंठ धाम स्मशानभूमीत शुक्रवारी दि 4 रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे. दैनिक लोकसंचार परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
Author: Lok Sanchar
परभणी ( प्रतिनिधी ) परभणी जिल्ह्यातील कामगार विभागातील काही अधिकारी, दलाल व ग्रामसेवक, नगरपालिका, महानगर पालिका मधील काही अधिकारी यांनी संगनमत करीत बांधकाम कंत्राटदारांचे बनावट प्रमाणपत्रे मान्य करत जवळपास 6 ते 7 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा केला आहे, त्यामुळे त्या रॅकेटची व बनावट प्रमाणपत्रे , लेबर कार्ड यांची उच्चस्तरीय चौकशी करून वंचित राहिलेल्या खऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी गावोगावी शिबिरे आयोजित करण्यात यावीत अशी मागणी आ राजेश विटेकर यांनी विधानसभेत केली खऱ्याखुऱ्या बांधकाम कामगारांना जगण्यासाठी आधार मिळावा यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे देण्यात येणारे लाभ बोगस लाभार्थ्यांना मिळाल्याने परभणी जिल्ह्यातील गरजू लाभार्थी या योजना पासून वंचित…
सेलू (प्रतिनिधी) अरण्यऋषी मारूती चितमपल्ली यांचे ‘ शब्दांचं धन ‘ हे पुस्तक शब्दांचे आकाश मोकळे करणारे आहे. या पुस्तकातील प्रत्येक लेख पिंपळपानाच्या साथीने उमलतो. मारूती चितमपल्ली यांना उमेदीच्या काळात सावलीसारख्या अनेक थोर व्यक्ती भेटल्या. त्यांच्या सोबतच्या आठवणींना या पुस्तकातून मारूती चितमपल्ली यांनी उजाळा दिला आहे. असे प्रतिपादन लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. अशोक खेत्री ( वडवणी ) यांनी केले. त्यांनी मारूती चितमपल्ली यांच्या ‘ शब्दांचे धन ‘ या पुस्तकावर स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाच्या वतीने आयोजित ‘ एक दिवस एक पुस्तक’ या मासिक उपक्रमाचे २९ वे पुष्प गुंफले. जंगल, वृक्ष, प्राणी, पक्ष्यांवर निस्सीम प्रेम करणारे मारूती चितमपल्ली यांचे…
कृषिदिनाचे औचित्य साधून केले वृक्षारोपण परभणी ( प्रतिनिधी) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांची जयंती दिनांक १ जुलै रोजी ‘कृषिदिन’ म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी महाविद्यालयाच्या सभागृहात स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यांच्या कार्याचे स्मरण करताना राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत विद्यार्थीनी श्रावणी जाधव हिने वसंतराव नाईक यांचे कृषी क्षेत्रातील योगदान आणि दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या निमित्ताने महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत जांभूळ, करंज आणि कडूनिंब यांसारख्या उपयुक्त…
परभणी (प्रतिनिधी) हरित क्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात कृषी विभाग, महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषद यांच्या वतीने कृषी दिन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर, रश्मी खांडेकर, मार्गदर्शक म्हणून प्रा. गजानन गडदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण, तालुका कृषी अधिकारी नित्यानंद काळे, गाढवे सर, दीपा बापट, मेघा देशमुख आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या दरम्यान परभणी जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन स्वाती घोडके…
परभणी (प्रतिनिधी) परभणी येथील आर.पी. हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट च्या वतीने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी मोफत बस सेवा सुरू करण्यात आली या सेवेचा शुभारंभ आ.पाटील यांच्या हस्ते रविवारी करण्यात आला. बस स्थानक येथे या सेवेचा शुभारंभ झाला.यावेळी डॉ. विवेक नावंदर आर. पी. हॉस्पिटलचे डॉ. आमेर तडवी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय गाडगे अनिल डहाळे अरविंद देशमुख सुभाष जोंधळे रामराव डोंगरे संभानाथ काळे,बाळराजे तळेकर विशू डहाळे मनोज पवार बंडू नाना बिडकर राहुल कांबळे अशोक गव्हाणे बाळासाहेब गोडबोले महेश पारवेकर कैलास पतंगे केदार दुधारे शिव चव्हाण अमोल कदम बबन कल्याणकर जीवन पैठणकर निखिल जैन शशी शिंदे गोविंद इक्कर प्रसाद चांदणे अजय चव्हाण आदी उपस्थित…
परभणी (प्रतिनिधी) परभणी येथील महावंदना आणि वृक्षमित्र कैलाश गायकवाड यांच्या माध्यमातून राजर्षी शाहू महाराज यांच्या १५१ व्या जयंतीच्या निमित्ताने वृक्ष लावून अभिवादन करण्यात आले. ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज या दोन प्रश्नांना डोळ्यासमोर ठेवून पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल आणि या दोन प्रश्नापासून जीवसृष्टीला सुरक्षित ठेवायच असेल तर झाडे लावावे लागतील.वाढत चाललेल तापमान आणि अवकाळी पडणारा पाऊस वृक्ष लागवड आणि वृक्षाचे संवर्धन केल्याने नियंत्रित होऊ शकतो.पावसाळ्याच्या ऋतूमध्ये हे कार्य सर्वांनी केलं पाहिजे. राजर्षी शाहू महाराज यांच्या १५१ जयंतीच्या निमित्ताने परभणी येथील खंडोबा बाजारातील स्मशानभूमीत वृक्षाची लागवड करून त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. भीमराव खाडे,भाई किर्तीकुमार बुरांडे, कैलास गायकवाड, भगवान जगताप,प्रा.डॉ.आनंद…
परभणी, (प्रतिनिधी) : छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे सामाजिक क्रांतीचे अग्रदूत होते. समाजातील शोषित, वंचित आणि उपेक्षित घटकांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी आपल्या राजेपदाचीही पर्वा न करता कार्य केले. समतेच्या मूल्यांसाठी त्यांनी जातीय बंधनांवर प्रहार केला, असे मनोगत परभणी महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव यांनी व्यक्त केले. सामाजिक न्याय विभाग व सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय परभणी यांच्यावतीने शिवाजी महाविद्यालय सभागृहात छत्रपती राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी मनपा आयुक्त धैर्यशील जाधव बोलत होते, यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र विभागाचे संचालक प्रा. डॉ. राजेंद्र गोणारकर…
गंगाखेड (प्रतिनिधी) शहरातील सामाजिक समूह सवंगडी कट्टा यांच्यातर्फे मागील आठ दिवसापासून आयोजित वारकरी सेवा शिबिराचा समारोप दिनांक 24 जून रोजी संत जनाबाई मंदिर येथे झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हेमंत मुंडे तर प्रमुख पाहुणे संत जनाबाई संस्थांनचे सचिव डॉ. दिनकर मुंडे, सामाजिक कार्यकर्त्या मंजुषा दर्डा, प्रसिद्ध चिकित्सक डॉ.संजय भरड, संघचालक अतुल तुपकर ,दानशूर व्यक्तिमत्व गोपाळ कात्रे व प्रभाकर आप्पा दावलबाजे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी या वारकरी शिबिरासाठी ज्यांनी ज्यांनी आर्थिक स्वरूपात, औषधी स्वरूपात, सेवेच्या स्वरूपात, प्रसिद्धी च्या स्वरूपात,इतर दृश्य ,अदृश्य स्वरूपात सेवा देणाऱ्या अशा सर्व दानदाते, सेवेकरी या सर्वांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला…
परभणी: ( प्रतिनिधी)आणीबाणी ही केवळ लोकशाहीची हत्याचं नव्हती, तर संविधानाच्या मूळ संकल्पनेवर घातलेला घाला होता. हुकूमशाहीचा वरवंटा किती भयानक असतो याची जाणीव भावी पिढ्यांना व्हावी यासाठी हा काळा दिवस लक्षात ठेवायला हवा अशी अपेक्षा आज परभणी येथे आयोजित ‘संविधान हत्या दिवसा’ निमित्त आयोजित कार्यक्रमात रामराव केंद्रे यांनी बोलताना व्यक्त केली. भारतीय जनता पार्टी परभणी महानगरच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना आणीबाणीच्या काळ्या दिवसांच्या काळात देशाने अनुभवलेल्या हुकुमशाहीच्या कटु आठवणींची उजळणी करतानाच आणीबाणीच्या काळात देशाच्या लोकशाहीसाठी संघर्ष करणाऱ्या ज्ञात-अज्ञात वीरांना वंदन केले. १९७५ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी घोषित केली होती. त्या घटनेला ५० वर्षे…