परभणी:(प्रतिनिधी)डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी बलिदान दिन निमित्त भाजपा परभणी महानगर कडून शहरातील हॉटेल ग्रीन लीफ जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारतीय जनसंघाचे संस्थापक काश्मीर साठी सर्वोच्च बलिदान देणारे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा बलिदान दीन निमित्त स्मृती दीन साजरा करण्यात आला. यावेळी सर्वप्रथम डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन भाजपा प्रदेश संयोजक (डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी बलिदान दिन) महाराष्ट्र मा.श्री. चैतन्यबापू देशमुख व मा.श्री. रामरावजी केंद्रे, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, संजय शेळके, मा.नगसेवक मोकिंद खिल्लारे, प्रशांत सांगळे, मोहन कुलकर्णी, मंडळाध्यक्ष स्वप्निल पिंगळकर, मधुसूदन जोशी, दैवत लाटे, सुरज चोपडे, ऋतुजा जोशी यांनी पुष्पहार अर्पण केला व विनम्र भावे अभिवादन केले. तसेच भाजपा पदाधिकारी व…
Author: Lok Sanchar
जिल्हा नियोजन समिती आढावा बैठक परभणी, प्रतिनिधी): जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-26 अंतर्गंत जिल्ह्यातील 385 कोटी तर अनुसूचित जाती योजनेचा 63 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर झाला असून, या अंतर्गंत विविध विकासकामांचे प्रस्ताव वेळेत तयार करून निधी वेळेत खर्च होईल, याचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत विभागप्रमुखांना दिले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित बैठकीस खासदार डॉ. फौजिया खान, आमदार विक्रम काळे, डॉ. राहुल पाटील, रत्नाकर गुट्टे, राजेश विटेकर, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, मुख्य…
परभणी :(प्रतिनिधी) शिवसेना पक्ष वाढवण्यात महिलांचा मोठा वाटा आहे. महिलांच्या कणखर नेतृत्वामुळे शिवसेनेची पाळेमुळे घट्ट झाली. आगामी काळात महिला जिल्हा संघटक अंबिकाताई डहाळे यांच्या नेतृत्वात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये शिवसेना (उबाठा) पक्ष मोठी झेप घेईल, असा विश्वास आमदार डॉ.राहुल पाटील यांनी व्यक्त केला. शिवसेना (उबाठा) पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशान्वये शिवसेना भवन येथून नवीन शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. यासाठी परभणी जिल्हा महिला आघाडी संपर्क प्रमुख ज्योती ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व आ. डॉ. राहूल पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे महिला जिल्हा संघटकपदी मनपातील माजी विरोधी पक्षनेत्या तथा महिला आघाडी विधानसभा संघटक अंबिका डहाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.…
परभणी: (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी परभणी महानगर तर्फे आज माईलस्टोन प्रायमरी स्कूल माळी गल्ली परभणी येथे दिनदयाळ अंत्योदय स्वंय् सहाय्यता महीला बचत गट व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मानपत्र देऊन करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्या सौ. भाग्यश्री शिंदे मॅडम, सुत्रसंचलन संतोष व्ही जाधव, आभार प्रदर्शन श्री विजय शेटे यांनी केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, प्राचार्य सौ.भाग्यश्री शिंदे मॅडम, ज्योती ताई डूब्बे, संघई ताई, घोडके ताई, पुजा शेटे, नितीन वैद्य, आभिक्षे घंटी आदिसह महीला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित होते.
परभणी,(प्रतिनिधी) : येथील गुरुतत्व प्रदीप परभणी आयोजित 108 श्री गुरुचरित्र सारामृत पारायण व श्री गुरुचरित्र कथामृत सोहळ्यास मंगळवारी (दि.17) येथील रंगनाथ नगरातील वैष्णवी मंगल कार्यालयाच्या सभागृहात प्रारंभ झाला. येथील गुरुतत्व प्रदीप या परिवाराच्या वतीने घरोघरी श्री गुरुचरित्र पोहोचावे या उदात्त हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मागील एका वर्षाच्या कालखंडात या परिवारातर्फे 108 व 1008 पारायणाचे सामुदायिक कार्यक्रम सर्व भाविक भक्तांच्या सहकार्याने यथोचित व यशस्वीरीत्या पार पडले होते. अधिकाधिक विभागात याच पध्दतीने गुरुतत्व बोधाचा दीप प्रज्वलित व्हावा या दृष्टीने या परिवाराने अधिकाधिक वाचक, साधक, श्रोता, दाता व संदेशवाहक यांच्यापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. याचाच एक भाग म्हणून वैष्णवी…
गंगाखेड. (प्रतिनिधी) प्रतिवर्षी प्रमाणे शहरातील संत जनाबाई मंदिर व परिसरात पंढरपूर ला विठुरायाच्या दर्शनासाठी विदर्भ व उत्तर मराठवाड्यातून निघालेल्या पायी दिंड्या रात्रीच्या मुक्कामी थांबतात.थकल्या, भागलेल्या वारकऱ्यांसाठी गंगाखेड शहरातील सवंगडी कट्टा सामाजिक समूह वारकरी आरोग्य सेवा शिबिराचे आयोजन करणार आहे.सेवेचे हे त्यांचे १० वे वर्ष असून सर्व महिला व पुरुष सवंगडी वारकऱ्यांची सेवा करण्यास सज्ज झाले आहेत. आषाढी एकादशी निमित्य विदर्भातून पायी पंढरपूर जाणाऱ्या बहुतांश दिंड्या संत जनाबाई चे जन्मस्थान असलेल्या गंगाखेड येथे मुक्कामी असतात, येथील त्यांचा विसावा आनंदात जावा यासाठी विविध क्षेत्रातील पुरुष व महिलांनी एकत्र येत सवंगडी कट्टा स्थापन करून त्या माध्यमातून वारकरी आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे.ज्यामध्ये सवंगडी…
परभणी (प्रतिनिधी) पुणे येथील अखिल लोककला कल्चरल ऑर्गनायझेशन भारत उत्सव 2025 यांच्यातर्फे दिल्या जाणारा श्रीमान तानाजीराव नन्नवरे स्मृतिप्रीत्यर्थ राष्ट्रीय लोककला पुरस्कार 2025 पुणे येथील वसंतराव नाईक सभागृहामध्ये मुंबई येथील प्रख्यात नृत्य दिग्दर्शक व डान्स इंडिया डान्स मधील आघाडीचे नृत्य दिग्दर्शक वैभव घुगे यांच्या हस्ते डॉ. पंकज खेडकर यांना प्रदान करण्यात आला त्याप्रसंगी संस्थेचे सचिव प्रमोद नन्नवरे सौ.विशाखा खेडकर, अवनी खेडकर व इतर मान्यवर
परभणी (प्रतिनिधी) भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे 25 वे जिल्हा अधिवेशन परभणी येथे दि 15 जून 2025 रोजी कॉम्रेड गोविंद पानसरे सभागृह (औषधी भवन) येथे संपन्न झाले या अधिवेशनात दि 9 जुलै रोजी भाजप सरकारच्य कामगार शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ देशव्यापी आंदोलनानिमित्त शेतकरी व कामगारांच्या कर्जमाफी कामगार कायदे गायरान आणि भूसंपादन यासह महत्वाच्या प्रश्नावर जिल्हाभर सत्याग्रह आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या अधिवेशनात 35 सदस्यांची जिल्हा कौन्सिल निवडण्यात आली. माधुरी क्षीरसागर यांची जिल्हा सरचिटणीस पदावर एकमताने निवड करण्यात आली तसेच ओमकार पवार आणि शेख अब्दुल यांची सहसचिव पदावर एकमताने निवड करण्यात आली. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संघटनात्मक अधिवेशनांची मालिका सुरु असून दि 15…
परभणी (प्रतिनिधी): येथील मंगलमूर्ती नगरातील जेष्ठ नागरिक वेदशास्त्र संपन्न भगवानराव जोशी वालूरकर यांचे शनिवार दि. 14 जून रोजी सकाळी 6.30 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी ते 100 वर्ष वयाचे होत. त्यांच्या पश्चात चार मुले, दोन मुली, सुना, नातू, नाती, पणतू असा मोठा परिवार आहे. ते राजेश्वर, संजय, शिवाजी व गिरीश जोशी वालुरकर यांचे वडील होत. त्यांच्या पार्थिवावर शनिवार दि. 14 रोजी सायंकाळी 5.30 वाजता जिंतूर रोडवरील वैकुंठ धामस्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
परभणी (प्रतिनिधी) कालच्या (गुरुवारी) जोरदार पावसाने लावलेल्या हजेरीत शहरातील स्टेडियम परिसरातील काही दुकानं समोर तळे साचले असून वारंवार सांगून देखील मनपा याकडे दुर्लक्ष करीत आहे. परिसरात नालीचे काम अर्धवट सोडले. परिणामी दुकानासमोर तळे साचले आहे मनपाशी काही जणांनी संपर्क साधला पण प्रतिसाद मिळाला नाही. काही दुकान समोर भर टाकल्याने बाकीच्या दुकानात पाणी शिरत आहे याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे