परभणी,(प्रतिनिधी) : गेल्या काही वर्षातील बदलत्या परिस्थितीमुळे पत्रकारितोसमोर सुध्दा मोठ मोठी आव्हाने उभी राहीली आहेत. ही आव्हाने माध्यमांना, पत्रकारांना स्विकारावी लागणार आहेत, तरच टीकाव लागणार आहेत, असे मत ज्येष्ठ पत्रकार श्रीमती हेमा रसाळ यांनी व्यक्त केले.
आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना दर्पण दिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम येथील पत्रकार भवन ट्रस्टद्वारे पत्रकार भवनात आज मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी हे अध्यक्षस्थानी होते.
पत्रकारिता क्षेत्रात दिवसेंदिवस मोठे बदल होत बदल स्विकारल्याशिवाय गत्यंतर नाही. स्पर्धेत टिकावयाचे असेल, तर हे बदल स्विकारणे अनिवार्य आहे. त्यामुळेच नव्या पिढीने हे बदल ओळखले पाहिजेत, स्विकारले पाहिजे, त्याद्वारे याक्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी केली पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार जोशी यांनी समाजबांधणीसह समाजसुधारण्यात पत्रकारितेचे मोठे योगदान आहे. या बदलत्या स्थितीत सुध्दा माध्यमांनी, पत्रकारांनी अत्यंत जबाबदारीने, अत्यंत गांभीर्याने समाजबांधणीचे, समाजनिर्मितीचे काम इनामे इतबारे बजावले पाहिजे. तरच समाज सर्वार्थाने सक्षमपणे उभा राहील व राष्ट्राची प्रगतीकडील वाटचाल सुकर होत राहील, असे म्हटले.
यावेळी पत्रकार प्रवीण देशपांडे यांनी प्रास्ताविकातून दर्पण दिनानिमित्त आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण या वर्तमानपत्रासह विविध भाषातील पहिल्या दैनिकांचा परिचय करुन दिला. तर पत्रकार प्रा. सुरेश नाईकवाडे यांनी आभार मानले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार दिलीप माने, संतोष धारासूरकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रभू दिपके, प्रदिप बनसोडे, आनंत पोहनेरकर, मोहसीन खान, दिनकर देशपांडे, उत्तम बोरसुरीकर, प्रमोद बल्लाळ, शिरीष जयपुरकर आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


