पुर्णा (प्रतिनिधी) नांदेड रस्त्यावरील चुडावा गावाजवळ दुचाकी आणि ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरची धडक होऊन २८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी(दि. २०) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.
पवन एंकनाथ गोरे (वय २८)रा. आनंदनगर पूर्णा असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पवन गोरे हा शुक्रवारी रात्री नांदेड येथून काम आटोपून दुचाकीने पूर्णाकडे येत होता. चुडावा गावाजवळील त्याच्या दुचाकीची ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरवर जाऊन धडकली. या अपघातात पवनच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यांने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरातील ग्रामस्थांनी त्याला तातडीने पूर्णा येथील रुग्णालयात हलविले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करुन मयत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच चुडावा पोलीसांचे ठाणेदार शिवाजी सिंगणवाड, पोलीस हवालदार मिटके, आनंदा तोटेवाड, अंमलदार संतोष जाधव व अन्य पोलीस कर्मचान्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेऊन पंचनामा केला.
अपघातानंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरुन निघून गेल्याची प्राथमिक माहिती असून, चुडावा पोलीसांनी अपघाताची नोंद करुन दोन्ही वाहने पोलीस ठाण्यात जमा केली आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार आनंद तोटेवाड करत आहेत.
०००


