परभणी (प्रतिनिधी) येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात राज्य परिवहन महामंडळाच्या शिवाई या बसच्या मागच्या चाकाखाली सापडून एका पादचाऱ्यांचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला

. ही दुर्दैवी घटना शनिवारी सायंकाळी 5:30 च्या सुमारास घडली.दोघे पादचारी या पुतळा परिसरातून रेल्वे स्थानकाकडे जात होते,त्यावेळी राज्य परिवहन महामंडळाची बस वळसा घालून स्टेशनकडे निघाली असताना वळणावरचं त्या बसच्या मागच्या चाकाखाली सापडून एकाचा मृत्यू झाला. तर दुसरा व्यक्ती जखमी झाला.
अपघात नेमका कसा घडला याचा पूर्ण तपशील हाती आला नाही, परंतु भर चौकातील रस्ते अपघाताने या ठिकाणी दुतर्फा वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या व काही काळ गोंधळ उडाला. अपघाता मृत्यू पावलेला पादचारी धर्मापुरी या गावचा असल्याची माहिती हाती आली आहे.


