जिंतूर,(प्रतिनिधी) : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा जिंतूर-सेलू विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी हरिद्वार येथे देवानंदजी बाबांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे दर्शन व आशीर्वाद घेतले. धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणात ही भेट पार पडली.
यावेळी मीनाताई बोर्डीकर, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेश दरगड तसेच पंचायत समिती सदस्य बालाजी सांगळे उपस्थित होते. याप्रसंगी रामप्रसाद बोर्डीकर यांनी देवानंदजी बाबांशी विविध विषयांवर चर्चा केली. तसेच त्यांचे आशीर्वाद घेतले.
रामप्रसाद बोर्डीकर हे राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात सक्रिय असून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो. हरिद्वार येथील या भेटीच्या निमित्ताने त्यांनी संत-महात्म्यांचे दर्शन घेऊन आध्यात्मिक समाधान प्राप्त केले. या भेटीदरम्यान उपस्थितांनीही देवानंदजी बाबांचे आशीर्वाद घेतले.
Thursday, November 19
ताज्या बातम्या:
- परभणी मार्केट यार्डात पहिल्याच दिवशी कापसास ९ हजार ८०० रूपये दर
- रामप्रसाद बोर्डीकर यांनी घेतले देवानंदजी बाबांचे आशीर्वाद : हरिद्वार येथे सदिच्छा भेट; मीनाताई बोर्डीकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
- साडेसात वर्षांच्या श्रीनिधीला बुद्धिबळात आंतरराष्ट्रीय मानांकन : रॅपिड प्रकारात 1,405 रेटिंग; जिल्ह्यातील सर्वांत लहान मानांकित खेळाडू
- पाथरी विधानसभा मतदारसंघातंर्गत परभणी तालुक्यातील गावांसाठी दुष्काळ निवारणार्थ प्रशासनाकडून आढावा
- मतदार यादी अचूक व अद्ययावत ठेवण्यासाठी मतदारांनी सहकार्य करावे – जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण; विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) २०२६ अंतर्गत मतदार यादी पुनरीक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर
- बालविवाहमुक्त परभणी’साठी सामूहिक सहभाग आवश्यक- जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण
- सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवू; राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य रवी कुमार कलोसे यांचे प्रतिपादन; परभणी मनपाच्या आढावा बैठकीत २४ विषयांवर चर्चा
- परभणी जिल्ह्यातील 450 कार्यरत तसेच सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर; जिल्ह्यातील चारही संवर्गांचा 100 टक्के सहभाग


