परभणी (प्रतिनिधी) जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील जनावर चोरीच्या गुन्ह्यांची स्थानिक गुन्हे शाखेने उकल केली असून गुन्ह्यातील दोघा आरोपींना ताब्यात घेतले आहे. या कारवाईतून विविध पोलिस ठाण्यात दाखल ५ गुन्ह्यांची उकल झाली असून आरोपींकडून १ लाख ९० हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

परभणी शहर व ग्रामीण हद्दीतील जनावरे चोरी मधील पाहिजे आरोपीतांचा शोध सुरु असताना जनावरे चोरी करणाऱ्या टोळीबाबत माहिती मिळाल्यानंतर पाहिजे असलेले आरोपी शेख खालिद उर्फ अशफाक उर्फ असलम (वय ३५) आणि नदीम मोईन कुरेशी (वय २३) दोघे रा. रहमाननगर सेलू यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी इतर साथीदारांच्या मदतीने परभणी शहरासह पालम, गंगाखेड, मानवत, पाथरी, जिंतूर हद्दीतील यापूर्वी केलेले १५ गुन्हे व ५गुन्हे केल्याचे कबूल केले. गुन्ह्यातील चोरी केलेल्या जनावरांची कत्तल करून मास विक्रीतून मिळालेली १ लाख ९० हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. या चौकशीत, सेलू पेलिसांतील दोन, ताडकळस, कोतवाली व परभणी ग्रामीण पोलिसांतील प्रत्येकी १ अशा ५ गुन्ह्यांची उकल झाली आहे. या कारवाईत आरोपी शेख खालिद उर्फ अशफाक उर्फ असलम (वय ३५) रा.रहमाननगर सेलू, नदीम मोईन कुरेशी वय (२३), रा. रहमाननगर सेलू, शेख अकबर शेख शौकत रा भिवंडी हल्ली मुक्काम जिंतूर(फरार), मुदसीर मुक्तार कुरेशी रा. फुलेनगर परभणी(फरार) आणी मुजाहिद मुक्तार कुरेशी रा. फुलेनगर परभणी(फरार) असे आरोपी उघड झाले आहेत. दोघा आरोपींना परभणी ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर फरार आपोपींचा पोलिस शोध घेत आहेत.
ही कारवाई पोलिस अधिक्षक पंकज कुमावत, अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनात तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरिक्षक गणेश सवंडकर, श्रेणी पोलिस उपनिरिक्षक मधुकर चट्टे, सहायक पोलिस उपनिरिक्षक सुग्रीव केंद्रे, सहायक पोलिस उपनिरिक्षक निलेश भुजबळ, पोलिस हवालदार सिद्धेश्वर चाटे, नामदेव डुबे, विलास सातपुते, चालक उत्तम हनवते, तांत्रिक सह्याय सहायक पोलिस उपनिरिक्षक बालाजी रेड्डी यांनी मिळून केली.
०००


