परमणी, (जिमाका): समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृह प्रवेश व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन २०२६-२७ अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाआयटी पोर्टलवर नवीन व नूतनीकरण ऑनलाईन अर्ज करण्यास दिनांक ३० नोव्हेबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, परभणी यांनी दिली आहे.
वसतिगृह प्रवेशासाठी स्पॉट ऍडमिशन नोंदणी दिनांक २८ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ६.०० वाजेपर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय किंवा संबंधित शासकीय वसतिगृहात प्रत्यक्ष येऊन करावयाची आहे. नोदणीनंतर पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत दिनांक ३० नोव्हेंबर २०२६ रात्री १२.०० वाजेपर्यंत आहे. तसेच वसतिगृह व स्वाधार योजनेचे सेंट बॅक/अंडर स्क्रुटनीमधील अर्ज त्रुटी पूर्ण करून दिनांक ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत फेरसादर करावेत.
सदर सुविधा वैद्यकीय, व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सुरू आहे. नोंदणीसाठी येताना सर्व आवश्यक मूळ कागदपत्रांच्या छायांकित प्रती सोबत आणाव्यात. नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार नाही. अर्ज करण्यासाठी अधिकृत पोर्टल hmasnew.mahait.org हे आहे.
जिल्ह्यातील सर्व पात्र विद्यार्थ्यांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता विहित मुदतीत अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अनिल अंजनीकर, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय यांनी केले आहे.
***


