परभणी,(प्रतिनिधी) : अखिल भारतीय पेशवा संघटनेच्या वतीने सर्व शाखीय ब्राह्मण समाजासाठी 21 व्या मोफत राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन रविवार 29 नोव्हेंबर रोजी परभणी येथील वैष्णवी मंगल कार्यालयात करण्यात आले आहे. सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत हा मेळावा होणार आहे. संघटनेच्या वतीने यापूर्वी 20 मेळावे यशस्वीरीत्या पार पडले असून, यंदा 21 व्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्याचे उद्घाटन बंडू नाना सराफ यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोनपेठकर योगेश जोशी राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले, माजी मंत्री सुरेशराव वरपुडकर, आमदार डॉ. राहुल पाटील, चिरायू हॉस्पिटलचे डॉ. राहुल आंबेगावकर आणि परळी वैजनाथचे माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी उपस्थित राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय पेशवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन वाडे-पाटील, राष्ट्रीय उपाध्यक्ष मोरेश्वर मार्डीकर, धनंजय नारळे, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाप्रमुख योगेश धर्माधिकारी, ब्राह्मण सभेचे अध्यक्ष रमेश देहेडकर, बीडचे जिल्हाप्रमुख अभय जोशी आणि नांदेड येथील ब्राह्मण सहाय्यक संघाचे अध्यक्ष अनिल डोईफोडे यांची उपस्थिती राहणार आहे.
या मेळाव्यासाठी सर्व शाखीय ब्राह्मण समाजातील प्रथम विवाह इच्छुक वधू-वरांसह घटस्फोटित, विधवा, विधुर तसेच दिव्यांग वधू-वरांची नावनोंदणी सुरू करण्यात आली आहे. इच्छुकांना प्रत्यक्ष मेळाव्याच्या ठिकाणीही नावनोंदणी करता येणार आहे. विवाह इच्छुक वधू-वरांनी आपल्या पालकांसह मेळाव्यास उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अखिल भारतीय पेशवा संघटनेचे जिल्हाप्रमुख तथा स्वागताध्यक्ष दीपक कासांडे, ज्येष्ठ समाजसेवक नंदकुमार पराडकर, विठू गुरु वझुरकर, जिल्हा संघटक श्वेता आचार्य, तालुकाध्यक्ष प्रताप कुलकर्णी आणि शहराध्यक्ष संजय कुलकर्णी यांनी केले आहे. मेळाव्याचे आयोजन वधू-वर मेळावा आयोजन समिती, अखिल भारतीय पेशवा संघटना यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Tuesday, November 17
ताज्या बातम्या:
- आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी परभणीत सोमवारी भरती मेळावा : नामांकित आस्थापनांचा सहभाग
- परभणीत 29 नोव्हेंबरला अखिल भारतीय पेशवा संघटनेचा 21 वा राज्यस्तरीय वधू-वर मेळावा : सर्व शाखीय ब्राह्मण समाजासाठी मोफत आयोजन
- राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य रवि रामू कलोसेजी 18 नोव्हेंबर रोजी परभणी दौऱ्यावर
- शासकीय वसतिगृह प्रवेश व स्वाधार योजनेच्या ऑनलाईन अर्जास ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
- आता ऊसतोड मुलांसह गर्भवतींची होणार तपासणी; साखर कारखाने व पालांवर ०-१८ वर्षाच्या मुले व महिलांना आरोग्य सेवा मिळणार
- जनावर चोरीच्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश ; ५ गुन्ह्यांची उकल, १.९० लाखांची रोकड जप्त
- हिंदुर्हदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेनेतर्फे अभिवादन
- नांदेड विभागातील चार रेल्वेगाड्यांच्या डब्यांच्या संरचनेत बदल : पारंपरिक जनरल डब्यांऐवजी सेकंड क्लास चेअर कार डबे जोडणार; 19 नोव्हेंबरपासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी


