परभणी(प्रतिनिधी) . दर वर्षी प्रमाणे याही वर्षी ओंकार भजनी मंडळाचे नवरात्रात नऊ दिवस देवीचे भजन संपन्न होत आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यात हे एकमेव भजनी मंडळ आहे जे फक्तं देवीचेच भजन रोज करतात त्यात देवीचे अभंग, पदे, गोंधळ, जोगवा, फुगडी, फुलवरा , पोत, एडका मदन, भारुड, विष्णुदासाच्या वेगवेगळ्या पदांना सुंदर चाली देऊन मंडळ देवी भजनाची अखंडीत परंपरा हभप ॲड सच्चिदानंद महाराज कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात 26 वर्षापासून चालवत आहे.
पहिल्या दिवशी घटस्थापना सुरुवात रविवार दिनांक 11 ऑक्टोबर श्री विवेक बळीराम वट्टमवार शिवाजी चौक, दुसरा दिवस सोमवार -12 ऑक्टोबर रोजी श्रीपाद शुक्ल ऑडिट नगर जिंतूर रोड , तिसरा दिवस मंगळवार -13 ऑक्टोबर -ॲड संजय औंढेकर. बस स्टँड रोड, चौथ्या दिवशी बुधवार -दिनांक 14 ऑक्टोबर रोजी – ॲड बिपीन पेकम, मारवाड गल्ली, शिवाजी चौक, ललिता पंचमी दिवशी
गुरुवार – 15 ऑक्टोबर रोजी श्री बालासाहेब वैद्य , सिंचन नगर येथे, सहावी माळ शुक्रवार -16 ऑक्टोबर रोजी श्रीनिवास रुद्रवार, कच्छी लाईन येथे, सातवी माळ शनिवार -17 ऑक्टोबर रोजी – डॉ दिपक गट्टी, रामकृष्ण नगर येथे आठवी माळ, रविवार – 18 ऑक्टोबर- अजय कुलकर्णी साळापुरीकर व्यंकटेश मोटर्स श्रेय नगर वसमत रोड येथे भजन संपन्न झाले आज अष्टमी निमित्त सोमवार – 19 ऑक्टोबर रोजी बालाजी मंदिर, ममता कॉलनी, व्यंकटेश नगर, कारेगाव रोड येथे भजन पार पडले.
या उत्सवात गुरुवारी दि. 22 ऑक्टोबर रोजी श्री लक्ष्मी नारायण मंदिर, स्टेशन रोड येथे एकादशी निमित्त गुरुवार पंचपदी व भजन होणार आहे या भजन उत्सवाची सांगता कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रविवार दिनांक 25 ऑक्टोबर रोजी-श्री अनिल नलबलवार, डॉ भक्कड हॉस्पिटल समोर, श्री साई मेडिकल मागे येथील भजनाने होईल. रोज रारात्री 8.35 ते 11 या वेळेत भजन होत आहेत. या उत्सवास सर्व भाविक उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून भक्त या नादब्रह्मात रंगुन नृत्य करत आनंद घेत आहेत.
हा भजन महोत्सव यशस्वी करण्यासाठी ओंकार भजनी मंडळाचे अध्यक्ष ॲड सच्चिदानंद महाराज कुलकर्णी व सन्माननीय सदस्य श्री टोपाजीराव फुलपगार, नरेंद्र शुक्ल, शंकर आजेगावकर, श्रीनिवास रुद्रवार, अनिल नलबलवार, नकुल काशीकर, अरुण पावडे, श्रीपाद शुक्ल, राम साडेगावकर, गजानन गुंडाळे, गोविंद केंढे, अमोल पारवेकर, मुकुंद पांडे, दत्तोपंत कुलकर्णी, मनोज कुलकर्णी, सुधीर चिद्रवार, शार्दुल कुलकर्णी, मनोज कोकडवार, मिलिंद कुलकर्णी, प्रमोद काशीकर, मेधज सरदेशपांडे, अनंत कदम, नारायण वाघ,राम आजेगावकर, संतोष कुलकर्णी, बाळासाहेब वैद्य, लक्ष्मीकांत कुलकर्णी, दिलीप अय्या, भगवान लिंगायत, गिरीश झरकर, ओमप्रकाश लोखंडे, मिलिंद देशपांडे, गजानन मारवाडी, गोपाळ कान्हेकर, सुरेश काशीकर, सागर ओमनवार, कृष्णा लोणीकर, त्रिंबक नेब, शिवराज पाथरकर, सूर्यकांत लोखंडे, शिवकुमार मालशेटवार, अभिजित फुटाणे, संजय पाठक, ओंकार धर्माधिकारी, बाळासाहेब शिंदे, दिपक आरळकर,दिलीप चारठाणकर, श्रीकांत कुलकर्णी, अजित मातेकर, दिलीप पदमवार, देवाशीष देशमाने, रेणुकादास धानोरकर, कालिदास पाचपोर, गंगाधर संघई, वेदांत केंढे, सुमेध कुलकर्णी आदी परिश्रम घेत आहेत. त्याचबरोबर महिला सदस्यांचा सुद्धा उत्स्फूर्तपणे सहभाग व प्रतिसाद मिळत आहे सर्व भाविक भक्तांनी या भजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन हभप ॲड सच्चिदानंद महाराज कुलकर्णी अध्यक्ष ओंकार भजनी मंडळ परभणी यांनी केले आहे



