परभणी,( प्रतिनिधी) परभणी महानगरपालिकेच्या वतीने श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी महानगरपालिकेच्या जलशुध्दीकरण केंद्र येथे कृतीम तलावाची निर्मिती करण्यात आली असून येथे मुर्ती विसर्जन होणार आहे अशी माहिती महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांनी दिली.
महानगरपालिकेने 2017 मध्ये जलशुद्धीकरण केंद्र येथे 21 फुट खोल असलेल्या कृतीम तलावाची निर्मिती केली आहे. 2017 पासून शहरातील श्री मूर्तींचे एकत्रित संकलन करून या ठिकाणी मूर्तीची विधिवत विसर्जन करण्यात येते. यंदाही महानगरपालिकेच्या वतीने शहरात ठिकाणाहून मूर्तींची संकलन केले जाणार आहे .तसेच मोठ्या गणेश मंडळाच्या मूर्तींची देखील विसर्जन या कृतीम तलावात केले जाणार आहे.गुरुवारी याची पाहणी महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांनी केली.यावेळी पोलीस अधिक्षक पंकज कुमावत,अतिरिक्त पोलीस अधिक्षक हे देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना येथे नार्वेकर यांनी सांगितले. कृत्रिम तलावात शहरातील सर्व गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने विविध पथकांची देखील स्थापना करण्यात आली आहे. पोलीस बंदोबस्त महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत उपस्थित राहणार आहेत असे देखील त्यांनी सांगितले. गतवर्षी 27 हजार गणेश मूर्तींचे विसर्जन या ठिकाणी करण्यात आले होते यंदा हा आकडा वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.उपायुक्त तुकाराम कदम,पाणीपुरवठा विभागप्रमुख तन्वीर मिर्झा बेग अभियंता मो.इस्माईल,माहीती जनसंपर्क अधिकारी राजकुमार जाधव,मुख्य स्वच्छता निरीक्षक श्रीकांत कुऱ्हा,मनोज खानापुरे,अग्मोंनिशामक विभाग प्रमुख दिपक कानोडे, पोलीस स्टेशनचे निरीक्षक कासले उपस्थित होते.
सिसिटिव्ही कॅमेरे
विसर्जन स्थळी व परिसरात सिसिटिन्ही कॅंमेरे बसवण्यात आले आहेत.याठिकाणी 100 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
…मोठ्या गणेश मूर्तींचे क्रेनने होणार विसर्जन….
शहरातील व परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात येणार आहे. कृत्रिम तलाव खोल असल्याने क्रेनच्या माध्यमातून मोठ्या मूर्तींची विसर्जन होणार आहे अशी माहिती आयुक्त नितीन नार्वेकर यांनी दिली.
रहाटी बंधाऱ्यात विसर्जन न करण्याचे आवाहन….
यंदा दुष्काळी परिस्थिती आहे.पूर्णा नदीपात्रात पाणी कमी आहे.येलदरी धरणात जलसाठी कमी असल्याने पुढील पावसाळ्यापर्यंत पाणी जपुन वापरावे लागणार आहे.रहाटी बंधारा येथे श्री गणेश मूर्तींची विसर्जन करू नका असे आवाहन आयुक्त नितीन नार्वेकर यांनी केले आहे परभणी शहरासह आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी श्री गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्र येथे यावे असे आवाहन त्यांनी केले


