- परभणी:(प्रतिनिधी) आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती सुख, समाधान आणि मानसिक शांततेच्या शोधात असते. मात्र, बाह्य परिस्थिती बदलण्याबरोबरच आपल्या विचारामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणणेही आनंदी जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. हाच संदेश देण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रेरक वक्त्या ब्रह्माकुमारी शिवानीदीदी यांचा ‘खुशियों का पासवर्ड’ हा विशेष मार्गदर्शन कार्यक्रम परभणी येथे आयोजित करण्यात आला आहे.

या संदर्भात माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना बहन अर्चना यांनी संपूर्ण माहिती दिली. ब्रह्माकुमारीज्, शिवराम नगर, परभणी यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सोमवार, १६ नोव्हेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ५:३० ते रात्री ८ या वेळेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अश्वमेध ग्राउंड, विद्यार्थी कल्याण कार्यालय परिसर येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे.
ब्रह्माकुमारी शिवानीदीदी या जीवन व्यवस्थापन, सकारात्मक विचार आणि आध्यात्मिक दृष्टिकोन या विषयांच्या मार्गदर्शनासाठी संपूर्ण देशात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून राष्ट्रपतींच्या हस्ते २०१८ मध्ये त्यांना प्रतिष्ठित ‘नारी शक्ती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. या मार्गदर्शनामुळे नागरिकांना आनंदी जीवनाचा दृष्टिकोन, मनःशांतीचे महत्त्व आणि नातेसंबंधांमध्ये सकारात्मकता कशी निर्माण करावी, याचे मार्गदर्शन मिळणार आहे असल्याचे सांगितलेसंध्याकाळी ५:३० ते ६:०० – सांस्कृतिक कार्यक्रम , संध्याकाळी ६:०० ते रात्री ८:०० – शिवानीदीदी यांचे मुख्य प्रवचन होणार असून या कार्यक्रमात प्रवेश विनामूल्य असला तरी पूर्वनोंदणी करणे अनिवार्य आहे.
इच्छुक नागरिकांनी omshanti.in/bks या संकेतस्थळावर आपली नोंदणी करावी. तसेच अधिक माहितीसाठी ९४२०९६५८७४ किंवा ८४६४३०२४४ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन ब्रह्मा कुमारी अर्चना दीदी यांनी केले आहे. यावेळी बिके बाबासाहेब तांदळे, बहन रूपाली, बिके पंडितराव बरदाळे, बीके स्वरासिंह परिवार, बिके राजेंद्र वडकर , बिके अरुण मराठे, बिके संतोष गलांडे आदी उपस्थित होते.


