परभणी,(प्रतिनिधी) : महाराष्ट्र नाभिक महामंडळ, परभणीच्या वतीने रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक वीर जिवाजी महाले यांच्या 391 व्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी शासकीय रुग्णालयात अभिवादन करण्यात आले, तर सावली वृद्धाश्रमात अन्नदानाचा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच वीर जिवाजी महाले चौक येथे जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

महापालिकेचे माजी उपमहापौर तथा सदस्य भगवानराव वाघमारे यांच्या हस्ते अन्नदानाचे वाटप करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष संपत सवणे, गणेश वाघमारे, संजय मुळे, संदीप सोळंके, सय्यद अजहर, रमेश देशमुख, जगन्नाथराव घोडके, गणेश गुंगे, संतोष जाधव, श्याम साखरे, राजकुमार सूर्यवंशी, संजय सोनवणे, आत्माराम राऊत, आत्माराम प्रधान, वसंत पारवे, केशव कंकाळ, गोविंद भालेराव, गोविंद शिंदे, गणेश भुसारे, विष्णू गोरे, वैजनाथ राऊत, प्रभाकर राऊत, बालाजी कंटाळे, संतोष वाघमारे, दगडू राऊत, सुनील भालेराव, योगेश पितांबरे, हरिभाऊ काटाळ, ऋतिक भवर, रामा सुरवंशी, सुशांत साखरे, ओमकार सुरसे, सचिन साखरे, कृष्णा काटाळ, कृष्णा वाघमारे आदी उपस्थित होते.


