परभणी,(प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महानगर जिल्हाध्यक्षपदी अक्षय देशमुख यांची निवड करण्यात आली.
राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पुढाकारातून तसेच ज्येष्ठ नेते नबाव मलिक व आमदार राजेश विटेकर यांच्या विशेष सहकार्यातून देशमुख यांची ही निवड करण्यात आली. मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात देशमुख यांना महानगर जिल्हाध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र बहाल करण्यात आले.
दरम्यान, आपले नेते स्व. अजित पवार यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा जपण्यासह परभणी महानगरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षास गतवैभव प्राप्त करुन देण्याकरीता आपण सर्वतोपरि प्रयत्न करु, असा विश्वास अक्षय दिलीपराव देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला.
Tuesday, October 13
ताज्या बातम्या:
- आ. डॉ. राहुल पाटील यांच्या आश्वासनानंतर स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन स्थगित
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माधव नगर विभागाचा 24 ऑक्टोंबर रोजी विजयादशमी उत्सव
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महानगर जिल्हाध्यक्षपदी अक्षय देशमुख यांची निवड
- राज्यात ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ राबविणार; संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाची पूर्वतयारी; चारा जतन, प्रक्रिया व उत्पादनावर भर
- दिवाळीत गड-किल्ल्यांच्या ‘दुर्गोत्सव २०२६’ मध्ये सहभागी व्हा!- दि. 5 ते 25 नोव्हेंबरदरम्यान ऑनलाइन नोंदणीची सुविधा
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६; आधार प्रमाणीकरणासाठी तिसरी यादी प्रसिद्ध; पात्र शेतकऱ्यांनी तातडीने प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन
- ॲग्रीव्हिजनच्या १०व्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी परभणीच्या ओमकार डोके, समीक्षा सुतार आणि सिद्धी काशीकर या तिघांची निवड; राष्ट्रीय व्यासपीठावर परभणी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व
- नांदेड रेल्वे विभागाच्या तिकीट तपासणी मोहिमेत 5.25 लाखांची वसुली : दोन दिवसांत 562 प्रकरणे उघड


