परभणी,(प्रतिनिधी) : मराठवाड्यातील शेतकर्यांना रब्बी हंगामासाठी नगदी हेक्टरी 50 हजार रुपयांची राज्य सरकारने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शिवसेनेच्या माजी आमदार सौ. मिराताई कल्याणराव रेंगे यांनी केल
जिल्हा प्रशासनास सादर केलेल्या निवेदनातून माजी आमदार सौ. रेंगे यांनी नुकसानग्रस्त खरिप व बागायती पिकांचे पंचनामे करण्यात यावेत, एनडीआरएफ, एचडीआरएफच्या निकषानुसार आर्थिक मदत द्यावी, जिल्ह्यात दुष्काळी सर्व सोयी, सुविधा लागू कराव्यात, जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचवावे, सुरळीत वीज पुरवठा करावा, जळालेले रोहित्र तातडीने दुरुस्त करावे, शेतकर्यांना दिवसा वीज पुरवठा करावा, पिकविम्याचा लाभ तातडीने मिळवून द्यावा, कर्जमाफीपासून वंचित पात्र शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ द्यावा, पीककर्ज वसुलीस स्थगिती द्यावी, कर्जाचे पुनर्गठण करावे, पाण्याचे व चार्याचे नियोजन करावे, असे मत सौ. रेंगे यांनी व्यक्त केले.
या निवेदनावर भागवत सूर्यवंशी, अशोक भोसले, अवधूत जाधव, आत्माराम वाघ, शिवाजीराव भोसले, गजानन देशमुख, नृसिंह खडके, दत्ता सिंगणे, माधवराव देशमुख यांच्या स्वाक्षर्या आहेत.


