परभणी ( प्रतिनिधी) परभणी येथील सरस्वती धन्वंतरी मेडिकल फाउंडेशन पाथरी रोड परभणी च्या व डॉ. प्रफुल्ल पाटील बीएससी नर्सिंग कॉलेजच्या नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचा व सरस्वती – धन्वंतरी डेंटल कॉलेज च्या पदयुत्तर (मास्टर ऑफ़ डेंटल सर्जरी) प्रवेशित विद्याथ्यांचा स्वागत सोहळा दिनांक 10 ऑक्टोंबर रोजी डॉ. प्रफुल्ल पाटील शैक्षणिक व हॉस्पिटल सभागृहात पार पडला. या वर्षी संस्थेच्या डॉ. प्रफुल्ल पाटील नर्सिंग कॉलेज मध्ये बीएससी नर्सिंग या ग्रॅज्युएट कोर्स साठी तसेच तीन वर्षाच्या डिप्लोमा Genral Nurse Midwifery व दोन वर्ष दोन वर्षाच्या डिप्लोमा Auxiliary Nurse Midwifery या तीन अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले त्यांचा व त्यांच्या पालकांचा स्वागत व परिचय समारोह संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलाने होऊन सर्व प्रवेशित विद्यार्थी व पालकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत व परिचय घेण्यात आला . कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय डॉ प्रफुल्ल पाटील हे होते तर व्यासपीठावर संस्थेचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्रो. डॉ. अर्चना जतानिया ,प्रो.डॉ. नम्रता पाटील ,प्रो.डॉ. विनिता मुरगोळ,प्रो.डॉ. उज्वला माकने, प्रो.डॉ. भरत देवसरकर, प्रो.डॉ.संध्या राठोड, प्रो.डॉ. पल्लवी दाशटवार तसेच नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य शेख अतिक, उपप्राचार्य जयंत देशमुख, डॉ.किरण सोनटक्के ,डॉ अमिना फिरदोस ,डॉ सुवर्णा शेलार, प्रशासकीय अधिकारी श्री शिवाजी जारे ,श्री अनंत मिलखे, श्री पवन मिलखे ,श्री श्याम साळुंके आदि उपस्थित होते कार्यक्रम प्रसंगी व्यवस्थापन परिषदेच्या सर्व सदस्य BSC Nursing, ANM,GNM अभ्यासक्रम विषयी विद्यार्थ्यांना, पालकांना सविस्तर मार्गदर्शन केले.अध्यक्षीय भाषणात डॉ. प्रफल्ल पाटील बोलताना म्हणाले भारतीय Nursing staff ला जगभरात नोकरी व व्यवसाय संधी उपलब्ध आहे.कोविडच्या वैश्विक महामारीनंतर भारतातच नव्हे तर सर्व विकसित देशात नर्सिंग स्टाफची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्यामुळे या अभ्यासक्रमात आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर अधिक व्यापक उपलब्धी व व्यवसाय संधी निर्माण झाली आहे. मानवतावादी सेवावृत्तीचा भाव नर्सिंग क्षेत्रात असल्याने हे एक आदराचे व गरजेचे क्षेत्र निर्माण झाले आहे.एमडीएस या ऊच्च्य पोस्ट ग्रेजुएट डेंटल अभ्यासक्रमास देशातच नव्हे तर विकसित देशात देखील खुप मोठी व्यावसायिक संधि उपलब्धत असल्याचे प्रतिपादन डॉ प्रफुल्ल पाटिल यानी केले . या वर्षी ७ एमडीएस विषयात २८ बीडीएस डॉक्टरानी पोस्ट ग्रेजुएट डिग्री साठी प्रवेश घेतला . दंत वैद्यकीय शाखेंसाठी हीं मराठवाड़ाचे दृष्टिनें मोठी उपलब्धि आहे व परभणीं साठी अभिमानाची बाब असल्याच्या भावना पालकानी वक्त्य केल्या. कार्यक्रमची प्रस्तावना उपअधिष्ठाता डॉ अर्चना जटानीया व नर्सिंग कॉलेज चे प्रिंसिपल डॉ शैख़ व डॉ जयंत देशमुख यानी केली . प्रसंगी डॉ भरत देवसरकर डॉ विनीता मुरकूड़ डॉ उज्ज्वला माकने डॉ पल्लवी सातभाए यानी मार्गदर्शन केले .आभार प्रदर्शन डॉ संध्या राठौड़ यानी केले .