परभणी ( प्रतिनिधी) शहरातील कारेगाव रोडवरील कौस्तुभ मंगल कार्यालयात दिनांक 6 फेब्रु शुक्रवार ते 8 फेब्रु रविवार दरम्यान संतश्रेष्ठ गजानन महाराज प्रगट दिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन आत्मोन्नती प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले आहे.
त्यामध्ये दि. 6 ते 8 दरम्यान दररोज सकाळी 8 ते 10 या वेळेत संतकवी दासगणू महाराज विरचित *श्री गजानन विजय* या ग्रंथाचे पारायण होणार आहे . दिनांक 6 फेब्रु. रोजी रात्री 8.00 वाजता प्रसिद्ध गायक कृष्णराज लव्हेकर यांच्या संचाचे *गीतरामायण* तसेच 7 फेब्रुवारी रोजी *हभप संजय महाराज जोशी वझरकर* यांचे कीर्तन होणार आहे.
दि.8 रोजी सकाळी श्रींस पंचसूक्त पवमान अभिषेक होणार असून त्यानंतर स. 10.30 वा *हभप माधवराव आजेगावकर* यांचे काल्याचे किर्तन होऊन एक ते पाच या वेळेत महाप्रसाद होणार आहे.
रात्री 8.00 ते 10.00 *ओंकार भजनी मंडळ* , परभणी यांचे भजन होऊन कार्यक्रमाची सांगता होणार आहे. नरेंद्र जोशी भार्गव कुलकर्णी जीवन पेडगावकर अनुराग लव्हेकर रूपाली लव्हेकर आदींची साथ संगत या कार्यक्रमास लाभणार आहे.
तरी या सर्व कार्यक्रमास जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आत्मोन्नती प्रतिष्ठान तर्फे शंकर आजेगावकर योगेश पाथरीकर उपेंद्र दुधगावकर दीपक कुलकर्णी गजानन खळीकर ईश्वर धर्माधिकारी संदीप कोकड अनिरुद्ध कुलकर्णी आदींनी केले आहे.


