परभणी, ( प्रतिनिधी) : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक कर्तव्यावर नियुक्त असलेल्या आणि टपाली मतपत्रिकेसाठी अर्ज केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सदर टपाली मतदान प्रक्रिया दिनांक 3 फेब्रुवारी 2026 ते 6 फेब्रुवारी 2026 या कालावधीत सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत गुरु नथुराम महाराज केहाळकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जिंतूर येथे राबविण्यात येणार आहे.
तरी निवडणूक कर्तव्यावर नियुक्त असून टपाली मतपत्रिकेची मागणी केलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ठरवून दिलेल्या वेळेत व ठिकाणी उपस्थित राहून आपले मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी श्री. शैलेश लाहोटी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती शीतल कच्छवे यांनी केले आहे.
*-*-*-*


