परभणी,(प्रतिनिधी) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या परभणी विधानसभा सहसंपर्कप्रमुखपदी शिवलिंग बोधने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई येथील शिवसेना भवनातून ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार, तसेच परभणी लोकसभा संपर्कप्रमुख प्रदीप खोपडे, आमदार डॉ. राहुल पाटील, जिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे, जिल्हाप्रमुख रविंद्र धर्मे आणि महानगरप्रमुख डॉ. विवेक नावंदर यांच्या शिफारशीनुसार ही नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात आले. शिवलिंग बोधने यांनी विविध शेतकरी आंदोलने आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम केले आहे. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी आतापर्यंत 110 वेळा रक्तदान केले आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे परभणी विधानसभा क्षेत्रात पक्षसंघटनेच्या कामाला बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या नियुक्तीबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकार्यांनी आणि शिवसैनिकांनी शिवलिंग बोधने यांचे अभिनंदन केले आहे.
Tuesday, October 13
ताज्या बातम्या:
- आ. डॉ. राहुल पाटील यांच्या आश्वासनानंतर स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन स्थगित
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माधव नगर विभागाचा 24 ऑक्टोंबर रोजी विजयादशमी उत्सव
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महानगर जिल्हाध्यक्षपदी अक्षय देशमुख यांची निवड
- राज्यात ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ राबविणार; संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाची पूर्वतयारी; चारा जतन, प्रक्रिया व उत्पादनावर भर
- दिवाळीत गड-किल्ल्यांच्या ‘दुर्गोत्सव २०२६’ मध्ये सहभागी व्हा!- दि. 5 ते 25 नोव्हेंबरदरम्यान ऑनलाइन नोंदणीची सुविधा
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६; आधार प्रमाणीकरणासाठी तिसरी यादी प्रसिद्ध; पात्र शेतकऱ्यांनी तातडीने प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन
- ॲग्रीव्हिजनच्या १०व्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी परभणीच्या ओमकार डोके, समीक्षा सुतार आणि सिद्धी काशीकर या तिघांची निवड; राष्ट्रीय व्यासपीठावर परभणी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व
- नांदेड रेल्वे विभागाच्या तिकीट तपासणी मोहिमेत 5.25 लाखांची वसुली : दोन दिवसांत 562 प्रकरणे उघड


