परभणी,(प्रतिनिधी): राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य रवि रामू कलोसेजी हे बुधवार, दि. १८ नोव्हेंबर २०२६ रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
दौऱ्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे. दि. १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता परभणी महानगरपालिका येथील सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या आणि विविध प्रलंबित बाबींवर चर्चा करण्यात येणार आहे. दुपारी १.०० वाजता परभणी येथील बी. रघुनाथ सभागृहात पत्रकार परिषद होणार आहे. सायंकाळी ४.०० वाजता ते रस्तेमार्गे परभणी येथून लातूरकडे प्रयाण करणार असून रात्री ७ वाजता लातूरकडे रवाना होणार आहेत.
****


