परभणी,(प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीच्या परभणी जिल्हा ग्रामीण कोअर कमिटीची बैठक शनिवार 14 नोव्हेंबर रोजी जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात प्रदेश सरचिटणीस सुनील राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
या बैठकीस राज्यमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे, प्रदेश सचिव प्रवीण घुगे, मराठवाडा संयोजक नितीन काळे, जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे आणि माजी आमदार सुरेश वरपुडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हाध्यक्ष भुमरे यांनी जिल्ह्यातील पक्ष संघटनेच्या कामकाजाचा तसेच संघटनात्मक स्थितीचा सविस्तर आढावा सादर केला. या बैठकीला संतोष मुरकुटे, महामंत्री आकाश लोहट, ऋषिकेश सकनूर, डॉ. पंडित दराडे, भीमराव वायवळ, प्रसाद खारकर यांच्यासह कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित होते.


