परभणी,(प्रतिनिधी) : येथील जिल्हा शासकीय स्त्री रुग्णालयाच्या अधिसेविका चंदाराणी अरुणकुमार लेमाडे यांच्या सेवापुर्ती भावपूर्ण गौरव सोहळ्यातून मान्यवरांसह सहकार्यांनी कार्यकाळाचे कौतूक करीत आठवणींना उजाळा दिला.
येथील हरिप्रसाद मंगल कार्यालयातील स्मृतिशेष राधाबाई रामभाऊ लेमाडे मंचावर आयोजित केलेल्या या कौटूंबिक कार्यक्रमास पुज्य भदन्त मुदितानंद थेरो, पुज्य भदन्त यश संघमित्रा यांच्या वंदनेने सुरुवात झाली. यावेळी ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. अशोक सोनी हे अध्यक्षस्थानी तर आमदार विक्रम काळे, आमदार डॉ. राहुल पाटील, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, भारतीय रिपब्लिकन पार्टी आठवले गटाचे राज्य संघटक डी.एन. दाभाडे, शिवसेनेचे नेते डॉ. विवेक नावंदर, उपाध्यक्ष भास्करराव चौके, श्रीमती अलकाताई वाकोडे, प्रियंका वाकोडे, नालंदा विपश्यना केंद्र समितीचे अध्यक्ष करण गायकवाड, शिवसेना नेते जलील पटेल, भिमप्रकाश गायकवाड, धनंजय रणवीर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी आमदार काळे यांनी शासकीय रुग्णालयात सुमारे 36 वर्षे निःस्वार्थ सेवा केल्याबद्दल सौ. चंदाताई लेमाडे यांचे कौतूक केले. आमदार पाटील यांनी सौ. लेमाडे यांनी सर्वांच्या सहकार्याने काम करतेवेळी कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून नावलौकिक मिळविला. अॅड. सोनी यांनी अध्यक्षीय समारोपात कौटूंबिक जबाबदार्या सांभाळतेवेळी शासकीय कामातील कर्तव्यनिष्ठपणा तसेच सामाजिक व धार्मिक कार्यक्रमातील लेमाडे यांचा सहभाग वाखाणण्याजोगा राहीला. अरुण लेमाडे व सौ. लेमाडे या दोघांच्या वागणुकीतून सातत्याने माणूसकीचा झरा वाहत आला आहे, असे ते म्हणाले. भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राज्य सचिव अॅड. लक्ष्मणराव बनसोडे यांनी लेमाडे दाम्पत्याचे काम नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे, असे म्हटले. भाजपाचे जिल्हाध्यक्ष भुमरे यांनी सेवानिवृत्तीनंतरही त्या सार्वजनिक जीवनात कार्यरत रहाव्या, अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ. नावंदर यांनी वैद्यकीय क्षेत्रात कार्य करतेवेळी लेमाडे यांनी कोरोनाच्या काळात दिलेल्या योगदानाचे कौतूक केले.
आपल्या प्रास्ताविकातून त्यांचे पती डॉ. अरुण लेमाडे यांनी शासकीय सेवेत सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावतेवेळी आपल्या पत्नीने कौटूंबिक जबाबदार्यासुध्दा समर्थपणे पेलावल्याबद्दल त्यांचे कौतूक केले. करोनाच्या काळात सुमारे 200 करोनाग्रस्त रुग्णांचा सांभाळ करतेवेळी सौ. लेमाडे यांचे धैर्य, जिद्द, आत्मविश्वास रुग्णांप्रती आस्था, आपुलकीचे दर्शन तीव्रतेने जाणवले. यावेळी ते आपल्या पत्नीच्या कामाप्रती असणार्या आठवणी विशद करतेवेळी भारावून गेले.
दरम्यान, या सोहळ्यास मधुकरराव प्रधान, पंजाबराव मोरे, एम.एम. भरणे, भूषण मोरे, राजकुमार लेमाडे, प्रा. भुजंगराव जोंधळे, मीनाताई देशमुख, आशाताई मालसमिंदर, शशीकलाताई मोरे, द्वारकाबाई गंडले, द्वारकाबाई साळवे, गोपीनाथ कांबळे, चंदन साबळे, बाळू धांडे, अशोकराव अंभोरे, एस.एम. वाकळे, मालतीबाई आदोडे, मेघा कोरटकर, विजया जामकर, मीनाक्षी भालेराव, माया कुलकर्णी, लता राजहंस, शितल शिंदे, दिक्षा वाघमारे, कौशल्याबाई आव्हाड यााच्यासह शेकडो नागरीक उपस्थित होते. प्रतीक लेमाडे यांनी सूत्रसंचालन केले तर भारत इंगळे यांनी आभार मानले.


