परभणी (प्रतिनिधी) गंगाखेड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मधील प्रभाग क्र. ११ (ब) मधून निर्वाचित नगरसेविका श्रीमती सिद्दीकी तबस्सूम इंतेसार (प्रतिवादी क्र. ०१) यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेली अपात्रतेची याचिका परभणीचे जिल्हाधिकारी श्री. संजयसिंह चव्हाण यांनी सुनावणीनंतर फेटाळून लावली आहे.
काय होता वाद?
वादाची सुरुवात करताना, वादी श्रीमती सोनिका विशाल साळवे यांनी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलम ४४(१)(अ) (तिसरे अपत्य लपवणे) आणि कलम ४४(१)(इ) (शासकीय जमिनीवर अतिक्रमण) अन्वये संबंधित नगरसेविकेला अपात्र ठरवण्यासाठी याचिका दाखल केली होती.
सुनावणी आणि निर्णय
या प्रकरणावर दोन्ही पक्षांचे वकील तसेच संबंधित वैद्यकीय अधिकारी (आकांक्षा हॉस्पिटल, परभणी) यांच्या उपस्थितीत विस्तृत सुनावणी घेण्यात आली. यादरम्यान सर्व पुरावे व दस्ताऐवजांची छाननी करण्यात आली. सर्व कायदेशीर बाबी, कागदपत्रे, दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि उच्च न्यायालयाचे संबंधित न्यायनिर्णय विचारात घेतल्यानंतर, वादींनी प्रतिवादी नगरसेविकेविरुद्ध केलेले आरोप कायदेशीर व ठोस पुराव्यांच्या अभावी सिद्ध होत नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
त्यामुळे, वादी श्रीमती सोनिका विशाल साळवे यांनी दाखल केलेली अपात्रतेची याचिका ३० ऑक्टोबर २०२६ रोजीच्या आदेशानुसार अधिकृतपणे फेटाळण्यात आली आहे.
या निर्णयामुळे तब्बस्सूम ईन्तेसार सिद्दीकी, सत्यपाल साळवे ऊप नगराध्यक्ष, अकबर साहब गट नेते,प्रताप मूंढे जिल्ह अध्यक्ष, सूमित कामत, उध्दव शिंदे, प्रमोद साळवे, चांद भाई, नसिर अहमद खूरैशी,नागनाथ क्सले राजू खान, बाळू बोडके, संदिप राठौड अनिल सेठ यान पल्लेवार विजय तापडीया, एकबाल चाऊस, ईफ्तेखार सिद्दीकि आदींनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जल्लोष व्यक्त केला


