परभणी,(प्रतिनिधी) : येथील सांगली अर्बन को. ऑप. बँक लि. सांगली या बँकेच्या स्थानिक शाखेच्या स्थलांतर व उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने बुधवारी सायंकाळी 5 वाजता प्रसिध्द गायक प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन यांची ‘मर्मबंधातली’ हा गीतसंध्येचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
वसमत रस्त्यावरील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात सायंकाळी 5 वाजता आयोजित केलेल्या या कार्यक्रमास ग्राहकांसह नागरीकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन या बँकेचे व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष गणेश गाडगीळ, अध्यक्ष श्रीपाद खीरे, उपाध्यक्ष संजय पाटील, सदस्य संजय धामगांवकर, सदस्य अशोक सावंत, सदस्य श्रीपाद चितळे, सदस्य जयंत काकतकर, बँकेचे ज्येष्ठ संचालक श्रीकांत देशपांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी उल्हास नाईक, सरव्यवस्थापक वासूदेव दिवेकर तर शाखा सल्लागार समितीचे सदस्य प्रभाकरराव देशमुख, श्रीनिवास मुंदडा, सुरेंद्र शहाणे, राजेश देशपांडे, मनिषा आनंद कोठेकर, श्रीमती सुरेखा सतीश हरदास, अॅड. किरण दैठणकर, मधुकरराव गव्हाणे, शंतनू वट्टमवार व शाखाधिकारी विष्णूप्रसाद सोनी यांनी केले आहे.


