परभणी ( प्रतिनिधी) ७० व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या निमित्ताने धम्म मैत्री संवाद अभियान व आम्ही भारताचे लोक आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या बुद्ध भीम गीत गायन स्पर्धेस उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. दोन्ही गटातील विजेत्या स्पर्धकांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके वितरण करण्यात आले.
सकाळी बी रघुनाथ सभागृह येथे सेलूचे नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक अतुल तात्या सरोदे, महाराष्ट्र लोककला संवर्धन मंडळाचे अध्यक्ष शकुंतला ढेरे,सुरेश हिवराळे,सुनीताताई साळवे, दिपक वारकरी, ॲड सुमनताई उफाडे, नगरसेवक सिराज भाई, सचिन पाचपुंजे,धम्मदीप भाऊ रोडे गौतमदादा भराडे आदी उपस्थित होते.
उद्घाटकीय मनोगत व्यक्त करताना मिलिंद सावंत म्हणाले की, तथागत भगवान बुद्ध व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करणाऱ्या व नव्या पिढीतील नवोदित गायकांना प्रोत्साहन देणाऱ्या अशा स्पर्धांची गरज आहे.
अतुल तात्या सरोदे बोलताना म्हणाले की सामाजिक धार्मिक सांस्कृतिक योगदानातून धम्म मैत्री संवाद अभियानाने सातत्य ठेवले असून समाज घटक म्हणून आपण सदैव सोबत असल्याचे म्हणाले.
या स्पर्धेत मराठवाडा विभागातून ३० च्या वर स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. यात लहान गटातून राकेश राजू लोखंडे (यलदरी) याने प्रथम पारितोषिक, हर्षदा राहुल सोनवणे (परभणी)द्वितीय पारितोषिक तर तृतीय पारितोषिक नांदेडच्या अति संजय ताजने याने पटकावले
मोठ्या गटातून शेख अजीम शेख करीम प्रथम पारितोषिक, सिद्धोधन धबाले द्वितीय पारितोषिक तर प्रेम वाकोडे याने तृतीय प्रादेशिक पटकावले. विजेत्या सर्व स्पर्धकांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊ सन्मानित करण्यात आले.
या पारितोषिक वितरण समारंभास कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश कांबळे, समाज कल्याण सभापती मनपा डॉ राजेश रणखांबे, नगरसेवक मिलिंद बामणीकर, शकुंतला ढेरे, सुनिता साळवे प्रमोद कुटे गौतम भराडे सुधाकर श्रीखंडे आदींची उपस्थिती होती.
या स्पर्धेस परीक्षक म्हणून भीमशाहीर दासराव पुंडगे, प्रा शिवाजी कांबळे यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन संजय बगाटे तर आभार प्रदर्शन संजीव आढागळे यांनी केले.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गौतम पंडित एम एम बरे राजकुमार एंगडे भूषण मोरे, सुधाकर श्रीखंडे रवी वावळे समीर रोडे नितीन टोंगराज पोर्णिमा एंगडे सुमित्रा लझडे गयाबाई हजारे शिवाजी सुगंधे भगवान वाघमारे पेंटर प्रमोद अंभोरे संघरत्न हातागळे राहुल धबाले दिलीप जोंधळे भास्कर देवरे अनिल गायकवाड संजय घनसावंत यांनी परिश्रम घेतले.
(छाया- संजय घनसावंत)


