परभणी,(प्रतिनिधी) : बालरंगभूमी परिषदेच्या वतीने आयोजित ‘जल्लोष लोककलेचा’ या स्पर्धेत समूह नृत्य प्रकारात जिंतूर येथील सिद्धेश्वर विद्यालय, समूह गायन प्रकारात परभणीतील बालविद्यामंदिर, एकल नृत्य स्पर्धेत स्वरा काळे, एकल गायनात स्वरा पाथरकर तर एकल वादनात कार्तिक सांगळे यांनी सर्वोत्कृष्ट पारितोषिक पटकावली असून महाअंतिम फेरीत प्रवेश केला. पाचही प्रकारांतील सर्वोत्कृष्ट विजेते 2 ऑक्टोबर रोजी लातूर येथे होणार्या महाअंतिम फेरीत परभणी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

स्पर्धेचे उद्घाटन रविवारी सकाळी साडेनऊ वाजता जिजाऊ ज्ञानतीर्थचे मार्गदर्शक रामराव लोहट यांच्या हस्ते झाले. यावेळी बालरंगभूमी परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते. लोहट यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व कलावंतांना शुभेच्छा दिल्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली. दिवसभर विविध कला प्रकारांच्या स्पर्धा रंगल्या. रात्री उशिरा पारितोषिक वितरण समारंभ झाला

यावेळी नगरसेवक मिलिंद बामणीकर, प्रा. संजय गजमल, अरविंद शहाणे, बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष आबा ढोले, उपाध्यक्ष नितीन लोहट, उपेंद्र दुधगावकर, त्र्यंबक वडसकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी दामुके, अनिकेत शेंडे, प्रा. किशोर विश्वामित्रे, मनीषा उमरीकर, राजू वाघ, संदीप राठोड व प्रकाश बारबिंड यांनी केले.
समूहनृत्य स्पर्धेत सिद्धेश्वर विद्यालय, जिंतूर सर्वोत्कृष्ट, गांधी विद्यालय कृषी सारथी शाखा, परभणी उत्कृष्ट, नृसिंह विद्यामंदिर, पोखर्णी उत्तम, तर ओयासिस इंग्लिश स्कूल, परभणी आणि जिजाऊ ज्ञानतीर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पाथरी रोड, परभणी यांना प्रशंसनीय पारितोषिक मिळाले. एकलनृत्य प्रकारात स्वरा काळे सर्वोत्कृष्ट, आंचल राठी उत्कृष्ट, आराध्या साठे उत्तम, तर माया दुधवडे व अनन्या गायकवाड प्रशंसनीय ठरल्या.
समूह गायनात बालविद्यामंदिर, नानलपेठ सर्वोत्कृष्ट, कै. रावसाहेब जामकर विद्यालय प्राथमिक उत्कृष्ट, कै. रावसाहेब जामकर विद्यालय माध्यमिक उत्तम, तर एन.व्ही.एस. मराठवाडा हायस्कूल आणि नृसिंह माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांना प्रशंसनीय पारितोषिक मिळाले. एकल गायनात स्वरा पाथरकर सर्वोत्कृष्ट, अनुष्का वाघ उत्कृष्ट, स्वराज परांडे उत्तम, तर श्रद्धा मोरे व सिद्धी आल्हाट प्रशंसनीय ठरल्या. एकल वादन स्पर्धेत कार्तिक सांगळे सर्वोत्कृष्ट, आनंद राऊत उत्कृष्ट, स्वराज परांडे उत्तम, तर श्रेयस कदम व शौनक दुधगावकर प्रशंसनीय ठरले.
स्पर्धेच्या आयोजनासाठी डॉ. अर्चना चिक्षे, संजय पांडे, प्रमोद बल्लाळ, नागेश कुलकर्णी, मनीषा उमरीकर, निर्मला वडसकर, सचिन आढे, प्रकाश बारबिंड, दिनकर देशपांडे, रामदास कदम, कुलदीपक उंडाळकर, सौरभ वडसकर, सुरेश भिसे, अर्जुन भिसे, दिगंबर गडगीळे, रामजी तळेकर, कौशल पामे यांच्यासह बालरंगभूमी परिषदेचे सदस्य व जिजाऊ ज्ञानतीर्थच्या कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.


