परभणी (प्रतिनिधी) गणेश वाचनालय, परभणी यांच्या वतीने संगीतप्रेमींसाठी एका विशेष संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सुर निरागस हो’ असे या कार्यक्रमाचे नाव असून याद्वारे रसिकांना सुरेल गाण्यांची मेजवानी मिळणार आहे.
सोमवार ०९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५:३० वाजता, गणेश वाचनालय, शनिवार बाजार, परभणी. येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात अनेक उदयोन्मुख व प्रतिभावान कलाकार आपली कला सादर करणार आहेत त्यात शार्दुल कुलकर्णी (गायक), सौम्या घोडके (गायिका), यश अबोटी (गायक), वरद देशपांडे (गायक)
रेणुका कुलकर्णी (निवेदिका) तर त्यांना गायनाला संगीतसाथ देण्यासाठी कृष्णा लिंबेकर (हार्मोनियम) रामदास कुलकर्णी (तबला) आनंद तर्टे (सिंथेसायझर) हे असणार आहेत.
परभणीतील तमाम संगीतप्रेमींनी या कार्यक्रमाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.


