परभणी (प्रतिनिधी) : परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने दिवाळी पहाट सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 5 नोव्हेंबर 2026 रोजी गुरूवार सायंकाळी 6:00 वा. स्थानिक कलावंताचा सांस्कृतीक कार्यक्रम व दि.6 नोव्हेंबर 2026 रोजी शुक्रवारी सकाळी 6 :00 वाजता बाबु आणि मी श्रीधर सुधीर फडके यांचा स्वरमय दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन राजगोपालचारी उद्यान येथे करण्यात आले आहे. महापौर, उपमहापौर, आयुक्तांसह पदाधिकारी व समिती सभापतींची उपस्थिती

या कार्यक्रमास महापौर सय्यद इकबाल, उपमहापौर गणेश देशमुख, महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर, उपआयुक्त प्रज्ञावंत कांबळे, उपआयुक्त तुकाराम कदम, स्थायी समिती सभापती सौ.प्रतिभाताई अतुल सरोदे, तसेच सभागृह नेते सय्यद समी उर्फ माजुलाला यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
*पाच तारखेला दिवाळी सांज*..
परभणी शहर महानगरपालिका सांस्कृतीक विभाग यांच्या वतीने दि. 05 नोव्हेंबर 2026 रोजी गुरूवार सायंकाळी 6 :00 वाजता दिवाळी सांज हा सांस्कृतीक कार्यक्रम आयोजीत केला असुन हा कार्यक्रम स्थानीक कलावंत अमजद खान, राहुल वहिवाळ, अनिकेत सराफ, कु. ओवी राजू काजे, मिलिंद जोशी, प्राचार्य नितीन लोहट, शुभम मस्के, धीरज पोळ, अनुष्का शहाणे, राजेश शाह, प्रा.कृष्णराज लव्हेकर आणि सौ. रुपाली लव्हेकर, योगेश पेडगावकर हे कलावंत कला सादर करणार आहेत.
*सहा नोव्हेंबर रोजी दिवाळी पहाट*
तसेच दिनांक 6 नोव्हेबर 2026 रोजी शुक्रवार सकाळी 6:00 वाजता स्वरमय दिवाळी पहाट बाबुजी आणि मी श्रीधर फडके यांचा दिवाळी पहाट हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असुन हया कार्यक्रमातील सुप्रसिध्द कलावंत गायक श्रीधर सुधिर फडके, गायिका सौ.शेफाली कुलकर्णी साकुरीकर, सौ.आसावरी बोधनकर, तबला वादक तुषार आग्रे, सुर्यवंशी बासरी आदित्य गोगटे, तालवाद्य नीलेश पाठक, निवेदिका सौ.सुकन्या जोशी यांची उपस्थिती राहणार आहे.
याशिवाय प्रभाग समिती सभापती रईस खान, मुसद्दीक खान, तबस्सुम वसीम शेख, समाज कल्याण समिती सभापती राजेश रणखांबे, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. अश्विनी अमोल जाधव, बांधकाम समिती सभापती सायरा बेगम अलीमोहीन, आरोग्य समिती सभापती अबोली कांबळे, विधी व अर्थ समिती सभापती रुखसाना बेगम हमीद जहागीरदार, शहर सुधार समिती सभापती सौ. शुभांगी शुभम पाष्टे, आणि शिक्षण समिती सभापती सौ. शमशाद बेगम सय्यद इलाही यांची उपस्थिती राहणार आहे.
तरि परभणी शहरातील जनतेने दिवाळी पहाट या स्वरमयी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन महापौर सय्यद इकबाल, उपमहापौर गणेश देशमुख, आयुक्त नितीनजी नार्वेकर, स्थयी समिती सभापती सौ. प्रतिभाताई अतुल सरोदे, उपायुकत प्रज्ञावंत कांबळे, तुकाराम कदम, यांनी आवाहन केले आहे.


