जिंतूर (प्रतिनिधी) एकमेव मान्यता प्राप्त एसटी कामगार संघटने तर्फे आज दुपारी आपले कर्तव्य बजावून जिंतूर एसटी आगारात आपल्या प्रलंबित मागण्या साठी घंटानाद आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले.
आपल्या मागण्या मान्य न झाल्यास तीन टप्यात आंदोलन राज्यभर केले जाईल असे लेखी निवेदन या पूर्वीच एसटी प्रशासनास अगोदरच दिले होते.आजपावेतो कोणताही पुढाकार प्रशासनाने न घेतल्याने हे घंटानाद आंदोलन आज मोठ्या प्रमाणावर करण्यात आले.
शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे महागाई भत्ता 60 टक्के करणे, दिवाळी बोनस 25 हजार रुपये देणे व अग्रीम सण उचल ही दिवाळीपूर्वी देणे अशा विविध मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे.
प्रशासनाने लक्ष न दिल्यास किंवा मागण्या मान्य न केल्यास यापुढील द्वारपाल आंदोलन व त्यानंतर चक्काजाम आंदोलन असेही लेखी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे. प्रशासन काय भूमिका घेते याकडे राज्यातील सर्व एसटी महामंडळ कर्मचारी कामगार व अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.


