परभणी (प्रतिनिधी) मागील एक वर्षापासून रमाई घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी अर्ज सादर केले आहेत, परंतु एकाही लाभार्थ्याला याचा लाभ मिळालेला नाही. अनुसूचित जाती घटकांसाठी हक्काचे घर म्हणून शासनाची रमाई घरकुल योजना असली, तरी संबंधित विभागाने अद्याप एकाही अर्जावर घरकुल मंजूर केलेले नाही.
रमाई घरकुल योजनेच्या अर्जावर घरपट्टी, लिंक रजिस्ट्री व लाईट बिल यासारख्या जाचक अटी लादल्या गेल्यामुळे अनेक लाभार्थी या योजनेपासून वंचिता राहावे लागत आहेत. त्यामुळे या जाचक अटी तात्काळ रद्द कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
आमच्या या मागणीवर प्रशासनाने १० दिवसांत कारवाई करावी व संबंधित विभागाला आदेश द्यावेत, अन्यथा १० दिवसानंतर लोकशाही मार्गाने आपल्या कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
- या निवेदनावर मुजाफर खान. प्रमोद आंबोरे संदीप खाडे. गणेश गाडे. रंजीत मकरंद प्रताप पंडित कपिल कांबळे वंचित बहुजन आघाडी यांचे स्वाक्षरी आहेत


