परभणी,(प्रतिनिधी) : येथील ज्ञानोपासक महाविद्यालयातील उपप्राचार्य प्रा. अशोक खोत यांचे गुरुवार 22 ऑक्टोंबर रोजी रात्री 7.30 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 72 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
दरम्यान, उपप्राचार्य खोत यांच्या पार्थीवावर शुक्रवार 23 ऑक्टोंबर रोजी दुपारी जिंतूर रस्त्यावरील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
उपप्राचार्य खोत हे अत्यंत शांत, संयमी व मनमिळावू असे व्यक्तीमत्व होते. झाकीर हुसेन महाविद्यालयात काही काळ अध्यापनाचे कामकेल्यानंतर ते ज्ञानोपासक शिक्षण प्रसारक मंडळाच्या ज्ञानोपासक महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ते परिचित होते. विशेषतः उत्तम व्याख्याते व उत्कृष्ठ संचलनकर्ते म्हणून प्रा. खोत यांचा नावलौकि होता. परभणी शहरासह जिल्ह्यातील सांस्कृतिक क्षेत्रातील विविध उपक्रम, साहित्य क्षेत्रातील संस्थांशी ते संलग्न होते, सक्रिय होते. विविध साहित्य संमेलनात त्यांचे मोठे योगदान होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संघटनेशीही ते संलग्न होते.


