परभणी,(प्रतिनिधी) : छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे आयोजित प्रतिष्ठित ‘वंदे मातरम् राष्ट्रीय शिबिरा’साठी परभणी येथील अनुराज मोहन रासकटला यांची निवड झाली आहे. माय भारत केंद्र, जिल्हा युवा अधिकारी कार्यालय, परभणी यांच्या अधिकृत पत्राद्वारे ही निवड जाहीर करण्यात आली. या शिबिरात ते महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
या राष्ट्रीय शिबिराच्या माध्यमातून देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक बांधिलकी, युवक नेतृत्व आणि सांस्कृतिक देवाणघेवाण या मूल्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. देशभरातील युवकांशी संवाद साधण्याची आणि राष्ट्रीय स्तरावर आपले विचार मांडण्याची संधी अनुराज यांना मिळणार आहे.
अनुराज रासकटला यांनी बुद्धिबळ, शिक्षण आणि समाजसेवा या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले आहे. विविध सामाजिक उपक्रमांमधील सहभागासह त्यांच्या नेतृत्वगुणांची दखल घेऊन त्यांची या शिबिरासाठी निवड करण्यात आल्याचे जिल्हा युवा अधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे. परभणीतील युवकाला राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने सर्व स्तरांतून अनुराज रासकटला यांचे अभिनंदन होत असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.
Saturday, November 14
ताज्या बातम्या:
- सोमवारी परभणीत ब्रह्मकुमारी शिवानी दीदीचे ‘खुशियों का पासवर्ड’ प्रवचन ; कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य
- मौलाना आझाद उर्दू प्रायमरी अँड हायस्कूलमध्ये ‘अब्दुल रहमान खान चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने शालेय गणवेश वाटप
- दुष्काळी परिस्थितीत फायनान्स कंपन्यांची बळजबरीची वसुली थांबवा : शिवसेनेची मागणी; सेलू तहसीलदारांना निवेदन
- भाजपच्या परभणी जिल्हा कोअर कमिटीच्या बैठकीतून जिल्ह्यातील संघटनात्मक कामकाजाचा आढावा : प्रदेश सरचिटणीस सुनील राणे यांची प्रमुख उपस्थिती
- वंदे मातरम् राष्ट्रीय शिबिरासाठी अनुराज रासकटला यांची निवड : रायपूर येथे होणार्या शिबिरात करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व; परभणीच्या शिरपेचात मानाचा
- ब्रह्मकुमारी शिवानी दीदी यांच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी महापौर सय्यद इकबाल यांच्याकडून स्थळाची पाहणी
- महापालिकेकडून श्वान निर्बीजीकरण मोहिम सुरु ; नागरिकांच्या तक्रारींची दखल
- 34 हजार दुय्यम न्यायालयीन कर्मचारी 17 नोव्हेंबरपासून बेमुदत संपावर : ‘समान काम, समान वेतन’ची प्रमुख मागणी


