हिंगोली, (प्रतिनिधी): जिल्ह्यातील निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी १७ ते २० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत जिल्हा कोषागार कार्यालय, हिंगोली येथे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात ऑनलाईन हयात प्रमाणपत्र (लाईफ सर्टिफिकेट) तयार करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कोषागार अधिकारी मनजीत गोरेगावकर यांनी दिली.
शिबिराचा लाभ घेण्यासाठी निवृत्तीवेतनधारकांनी आधार कार्ड, पीपीओ क्रमांक आणि बँक खाते पुस्तिका सोबत आणावी. ऑनलाईन हयात प्रमाणपत्र तयार केल्यानंतर संबंधित निवृत्तीवेतनधारकांना डिसेंबर २०२६ चे निवृत्तीवेतन अदा करण्यात येणार आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी जिल्हा कोषागार कार्यालयातील या शिबिरात उपस्थित राहून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हा कोषागार अधिकारी गोरेगावकर यांनी केले आहे.


