परभणी (प्रतिनिधी) परभणी शहरातील पाथरी रस्त्यावरील आ.डॉ. राहुल पाटील यांच्या आर.पी. हॉस्पिटलच्या वतीने ग्रामीण भागातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना आरोग्य सुविधा सहज उपलब्ध होण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. परभणी तालुक्यातील मिरखेल तट्टुजवळा, पिंगळी या मार्गावरुन आर. पी. हॉस्पिटलसाठी मोफत बससेवेचा शुभारंभ शुक्रवार, दि. ६ नोव्हेंबर रोजी करण्यात आला.
या नवीन बससेवेच्या शुभारंभामुळे संपूर्ण परभणी मतदारसंघातून आर. पी. हॉस्पिटलसाठी मोफत बससेवेची सुविधा उपलब्ध झाली असून ग्रामीण भागातील नागरिकांमधून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
आर. पी. हॉस्पिटलच्या वतीने परभणी शहरात मागील २ वर्षांपासून विविध मार्गावर मोफत बससेवा सुरु आहे. त्यानंतर ग्रामीण भागातील रुग्णांसाठी बससेवा सुरु करण्यात आली आहे. आ. पाटील यांनी ग्रामीण भागातील नागरिकांसाठी पुढाकार घेऊन पहिल्या टप्यात धार, मांगणगाव, सावंगी मार्गावर मोफत बस सेवा सुरु केली. तसेच आता मिरखेल, तट्टुजवळा, पिंगळी, खानापूर या मार्गावर बस सुरु करण्यात आली आहे. ही बस मिरखेल येथून दररोज सकाळी १० वाजता सुटून तट्टूजवळा १०.१० आणि पिंगळी १०.२० वाजता अशी धावणार आहे.
या मार्गांवरील मोफत बससेवेच्या शुभारंभ गुरुवर्य राम महाराज मिरखेलकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी परभणी विधानसभा प्रमुख रविंद्र पतंगे, तालुकाप्रमुख संदिप झाडे, तालुका संघटक बंडू नाना बीडकर, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष उत्तम मुळे, किशन कदम, सदाशिव कदम, रवी कदम, रामा कदम, दिपक जाधव, अंगद कदम, प्रकाश कदम, रावसाहेब देशमुख, नारायण देशमुख, शरद देशमुख, पांडुरंग देशमुख, नागनाथ देशमुख, बापुराव थोरवड, दिगांबर थोरात, विष्णू घोंगडे, तुकाराम कदम, प्रभाकर कदम व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


