परभणी (प्रतिनिधी) जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी व जिल्हा कारागृह वर्ग-२, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा कारागृह वर्ग-२ येथे ‘दिवाळी पहाट वर्ष २ रे’ संगीतोत्सवाचे आयोजन दिनांक ०७/११/२०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता करण्यात आले.

श्री. आर. एम. सादराणी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायालयीन बंदी यांच्याकरिता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आली. बंदीजनांच्या मनामध्ये सकारात्मक आनंद आणि नवचैतन्य निर्माण व्हावे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. या कार्यक्रमाकरीता प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. भूपण म. काळे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी तथा दिवाणी न्यायाधीश व स्तर, परभणी यांनी उपस्थित सर्व न्यायबंदी यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात.
संगीत व सांस्कृतिक कार्यक्रम: या संगीतोत्सवकरीता संगीतकार म्हणून डॉ. सुधीर वनशेतकीकर, डॉ. सी. विनया वनशेतकीकर, श्रीराम वाघमारे आणि सौ. रंजीता वाघमारे यांनी अभंग, भक्तीगीते, भावगीते, देशभक्तीपर गीत आणि दिपावली विशेष यांचे गायन करून त्यांच्यातील कलागुणांचे प्रदर्शन केले.
सदर कार्यक्रमास श्री. पांडुरंग भूसारे, अधीक्षक, जिल्हा कारागृह वर्ग-२, श्री. राजेंद्र मरळ, तुरुंगअधिकारी, श्रीमती स्वाती जाधववर, उपतुरुंगाधिकारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी येथील कर्मचारी तसेच जिल्हा कारागृह येथील कर्मचारी वृंद यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.


