परभणी,(प्रतिनिधी) : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागांतर्गत धावणार्या चार रेल्वेगाड्यांच्या डब्यांच्या संरचनेत बदल करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार संबंधित रेल्वेगाड्यांना सध्या जोडण्यात येणार्या पारंपरिक आयआरएस प्रकारच्या डब्यांऐवजी सीबीसी प्रकारचे डबे जोडण्यात येणार आहेत. या बदलामुळे डब्यांच्या संरचनेत सुधारणा होऊन प्रवाशांना अधिक सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.
सध्या संबंधित रेल्वेगाड्यांना एकूण 16 डबे जोडण्यात येतात. यामध्ये 14 जनरल सेकंड क्लास (जीएस) डबे आणि दोन सेकंड क्लास लगेज-कम-ब्रेक व्हॅन (एसएलआर) डब्यांचा समावेश आहे. सुधारित संरचनेनुसार यापुढेही एकूण 16 डबेच राहणार असून, त्यामध्ये 14 सेकंड क्लास चेअर कार (डब्ल्यूजीएससीझेड) प्रकारचे डबे आणि दोन एसएलआर डबे असतील.
या बदलाची अंमलबजावणी चार रेल्वेगाड्यांमध्ये टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. गाडी क्रमांक 57651/57652 हजूर साहिब नांदेड-मनमाड-हजूर साहिब नांदेड या रेल्वेच्या डब्यांच्या संरचनेत नांदेड येथून 19 नोव्हेंबर 2026 आणि मनमाड येथून 20 नोव्हेंबर 2026 पासून बदल लागू होईल.
गाडी क्रमांक 57653/57654 पूर्णा-आदिलाबाद-परळी वैजनाथ या रेल्वेच्या डब्यांची नवीन संरचना पूर्णा येथून 20 नोव्हेंबर आणि आदिलाबाद येथून 21 नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. गाडी क्रमांक 57655/57656 परळी वैजनाथ-अकोला-पूर्णा या रेल्वेच्या डब्यांच्या संरचनेत परळी वैजनाथ येथून 21 नोव्हेंबर आणि अकोला येथून 22 नोव्हेंबरपासून बदल करण्यात येईल. तसेच गाडी क्रमांक 57657/57658 पूर्णा-परळी वैजनाथ-पूर्णा या रेल्वेची नवीन डब्यांची संरचना पूर्णा आणि परळी वैजनाथ येथून 22 नोव्हेंबर 2026 पासून लागू होणार आहे.
या बदलांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. प्रवाशांनी रेल्वेगाड्यांच्या सुधारित डब्यांच्या संरचनेची नोंद घ्यावी, असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या जनसंपर्क विभागातर्फे करण्यात आले आहे.
Monday, November 16
ताज्या बातम्या:
- नांदेड विभागातील चार रेल्वेगाड्यांच्या डब्यांच्या संरचनेत बदल : पारंपरिक जनरल डब्यांऐवजी सेकंड क्लास चेअर कार डबे जोडणार; 19 नोव्हेंबरपासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी
- दुचाकी वाहनांसाठी MH22BN ही नवीन मालिका सुरू; पसंती क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन
- हक्काच्या पाण्यासाठी आमदार डॉ. गुट्टे आक्रमक; जायकवाडी कालव्यात पाणी सोडा, अन्यथा उद्यापासून आमरण उपोषण
- परभणी जिल्ह्यात ३० नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी लागू; पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास मनाई
- दुष्काळी संकटाचा सामना करण्यासाठी पहिल्या टप्प्यात 25 हजार जलतारा शोषखड्ड्यांची निर्मिती करणार ; अनधिकृत नळजोडण्या बंद करण्यासह पाणी बचत, स्वच्छता आणि चारा नियोजनावर भर
- भटके-विमुक्त समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध ; भटके-विमुक्त प्रमाणपत्र व योजना विशेष अभियानाच्या अनुषंगाने बैठक संपन्न
- प्रा. डॉ. सखाराम कदम यांचा ‘समीक्षा विधान’ हा ग्रंथ म्हणजे साहित्यकृतीचे सौंदर्य उलगडणारा ग्रंथ : डॉ. साहेब खंदारे यांचे प्रतिपादन
- जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाची१६ नोव्हेंबर रोजी आयोजन


