परभणी (प्रतिनिधी) येथील प्रगतशील शेतकरी प्रभाकरराव गणपतराव सराफ यांचे सोमवारी सकाळी वृद्धकाळामुळे निधन झाले. मृत्यूसमयी ते 89 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात प्रसिद्ध विधीज्ञ राजेंद्र सराफ, रेणुका मंगल कार्यालयाचे संचालक महेश सराफ या दोन मुलांसह सून,तीन कन्या, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
दरम्यान सराफ यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी पाच वाजता जिंतूर रस्त्यावरील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी गव्हाणे रस्त्यावरील सराफ यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघणार आहे.
जून्या पिढीतील सराफ हे मराठवाडा कृषी विद्यापीठातील पहिल्या बॅचचे बीएस्ससी ऍग्री पदवीधारक होते.उत्तम, प्रगतशील शेतकरी, मार्गदर्शक म्हणून सुपरिचित होते. क्रीडा क्षेत्रात बॅडमिंटनचे ते चॅम्पियन होते. कुस्ती, हॉकी व फुटबॉल या खेळाचे सुध्दा ते उत्कृष्ट खेळाडू म्हणून परिचित होते, क्रीडा क्षेत्रातील विविध संघटनांशी ते संलग्न होते.
कलाक्षेत्रातही त्यांचे योगदान होते. ते स्वतः उत्तम तबलावादक होते. येथील ललित कला भवनाचे ते तत्कालीन सचिव होते. परभणी तालुका खरेदी विक्री संघावरही ते अनेक वर्ष संचालक म्हणून कार्यरत होते. जुन्या पिढ्यातील एक उत्तम शेतकरी, खेळाडू, मार्गदर्शक व कलावंताच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
सराफ कुटुंबावर कोसळलेला दुखत दैनिक लोकसंचार परिवार सहभाग आहे


