परभणी (प्रतिनिधी)प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी दि 3 जानेवारी 26 रोजी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने साजरी करण्यात आली.

या प्रसंगी बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष इंजिनीयर एम एम भरणे यांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून व भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणीच्या सर्व पदाधिकारी यांनी पुष्प समर्पित करुन अभिवादन केले. या प्रसंगी बौद्ध महासभेचे कोषाध्यक्ष दशरथ गायकवाड, समता सैनिक दलाचे डिव्हिजनल ऑफिसर सुनील पवार व समता सैनिक दलाचे जवान उपस्थित होते. तसेच भारत खाडे, वामन खराटे,एस एस साळवे,एम.एम बरे,, गोपीनाथ कांबळे , बाबासाहेब धबाले,पी एल वानखेडे, राजकुमार एंगडे,आदींची उपस्थिती होती, शेवटी दशरथ गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केले व कार्यक्रम संपन्न झाला. (छाया संजय घनसावंत)


