परभणी (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम करावे, आपला विकास साधावा आणि सर्व स्वप्न साकार करावी. पालकांनी देखील विद्यार्थी स्पर्धेच्या युगात पुढे जावा, टिकावा यासाठी प्रयत्न करावेत व विद्यार्थ्यांच्या आवडीप्रमाणे अभ्यासक्रमाची निवड करू द्यावी.विद्यार्थ्यांनी शालेय व महाविद्यालयीन जीवनात वेळेचा सदुपयोग करून सोशल मिडियातील विचलित करणाऱ्या मोहापासून दूर राहण्याचे तसेच शिस्तीचे पालन करून जीवन समृद्ध करावे.* असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नतिशा माथूर यांनी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ प्रसंगी केले. बाल विद्यामंदिर शिक्षण संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थचे अध्यक्ष माननीय डॉ. एन. ए. झरकर,तर प्रमुख पाहुणे म्हणून परभणी जि. प.…
Author: Lok Sanchar
परभणी (प्रतिनिधी) दरवर्षी प्रमाणे याही वर्षी वैभव नगर शाखेत गुरुपौर्णिमेचे आयोजन इ 8 वी जी या वर्गातर्फे करण्यात आले होते.व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रशालेचे पर्यवेक्षक प्रदिप रुघे तर प्रमुख अतिथी म्हणून उखळकर सर होते. प्रथम माता सरस्वती आणि व्यास ऋषीमुनी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, व्यासपीठा वर उपस्थित असलेल्या सर्व शिक्षकवृंद यांचे औक्षण करून गुरुप्रती आदराची भावना म्हणून पुष्प आणि श्रीफळ देऊन विध्यार्थ्या तर्फे शिक्षकांचा गौरव करण्यात आला.वर्गातील पुष्कळ विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून आणि भित्ती पत्रकातून आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे अतिथी श्री उखळकर सर यांनी पौरांनीक गोष्टींचा उल्लेख करून गुरुशिष्य परंपरा किती मोठी आहे हे विशद केले तर प्रदिप रुघे…
गंगाखेड,(प्रतिनिधी) : येथील महर्षी याज्ञवल्क्य वेद विद्यालय, यज्ञभूमी या ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्त पारंपरिक, धार्मिक व आध्यात्मिक विधींचा भव्य सोहळा आज गुरुवार 10 जुलै रोजी आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात राज्यभरातून आलेल्या पाच हजारांहून अधिक शिष्यांनी सहभाग नोंदवला. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी या सोहळ्याचे उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले गवामयन सत्र. या सत्रात श्रुती-पाठ, वेदघोष आणि धर्मशास्त्रावर आधारित मार्गदर्शन करण्यात आले. तसेच, सोमयागी पूज्य रंगनाथ दीक्षित सेलुकर महाराज यांच्या समाधीस्थळी अभिषेक व विशेष वेदविधी पार पडले. यानंतर यज्ञेश्वरजी सेलुकर महाराज यांच्या पाद्यपूजनाचा व पालखी मिरवणुकीचा सोहळा अत्यंत भक्तिभावाने पार पडला. संपूर्ण यज्ञभूमी परिसर वेदमंत्र, घोषवाक्ये व भक्तांच्या जयघोषांनी दुमदुमला. गुरुपूजन, वेदपाठ, कीर्तन, प्रवचन या…
परभणी,(प्रतिनिधी) : येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त बुधवारी (दि.09) सायंकाळी खंडोबा बाजार येथील मराठवाडा हायस्कूलच्या प्रांगणातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापर्यंत भव्य मशाल रॅली काढण्यात आली. या मशाल रॅलीत मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थीनी सहभागी झाले होते. अतिशय शिस्तबध्द पध्दतीने निघालेल्या या मशाल यात्रेत कार्यकर्ते पेटती मशाल हातात घेऊन अग्रभागी होते. यावेळी विद्यार्थी परिषद जिंदाबाद, भारत माता की जय, वंदे मातरम्, जय श्री राम वगैरे घोषणांनी प्रमुख चौकांसह रस्ते दणाणून गेले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात या मशाल यात्रेचा समारोप झाला. यावेळी विद्यार्थी परिषदेचे विभागीय संघटन मंत्री शुभम स्वामी, शहर संघटन मंत्री सुशांत…
पालम (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य पदी पालम येथील लिंबाजी गंगारामजी टोले यांची निवड करण्यात आली. लिंबाजी आन्ना टोले यापूर्वी प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी कार्यरत होते. मागील अनेक वर्षापासून लिंबाजी आन्ना टोले भाजपामध्ये निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांची आता पक्षाने राज्य कार्यकारणी परिषदेवर सदस्य पदी निवड करण्यात आली. पालम तालुका भाजपाच्या वतीने पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी भा. ज. पा. प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवाजी दिवटे, पालम तालुका सरचिटणीस भगवान करंजे, जिल्हा उपाध्यक्ष निवृत्ती सारोळे, हनुमान देशमुख, पद्माकर जोशी आदी उपस्थित होते.टोले यांच्या निवडी बदल शहरात विविध ठिकाणी सत्कार करण्यात आला व शुभेच्छा देण्यात आल्या
परभणी,(प्रतिनिधी) अन्न व पुरवठा विभागाच्या अन्नसुरक्षा आणि अंतोदय योजनेतील लाभार्थ्यांची उद्दिष्ट संख्या वाढवून अन्नधान्याचा लाभ द्या अशी मागणी आमदार डॉ.राहुल पाटील यांनी केली विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आमदार पाटील यांनी अन्नसुरक्षा योजनेतील वंचित लाभार्थ्यांचा प्रश्न उपस्थित केला परभणी तालुक्यात अन्नसुरक्षा योजनेची 60 हजार आणि अंतोदय योजनेचे पाच हजार लाभार्थ्यांना अजूनही योजनेचा लाभ मिळत नाही याबाबत तक्रार केली असता अन्न व पुरवठा विभागाने खोटी माहिती देत सभागृहाची आणि जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप आमदार डॉ.पाटील यांनी केला. तहसीलदारांचे पत्र असतानाही पुरवठा विभागाकडून शिलकी इष्टांक दाखवत खोटी माहिती कशी दिली जाते असा प्रश्न सभागृहात करत पुरवठा विभागाला धारेवर धरले. सन 2011 च्या जनगणनेनुसार राज्यात अन्नसुरक्षा…
परभणी (प्रतिनिधी) दि. ७ रोजी भारतीय जनता पार्टीचे नूतन प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांचे परभणीमध्ये भाजप महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे व पदाधिकाऱ्यांच्या वतीने रेल्वे स्थानक ते सावली विश्राम गृह बाईक रॅली काढून स्वागत करण्यात आले. भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण हे परभणी रेल्वे स्थानक येथून सावली विश्रामकडे जात असताना बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पालम (प्रतिनिधी) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या मुंबई येथील पीपल्स एज्युकेशन संस्थेच्या वतीने सामाजिक कार्यात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तीस दरवर्षी दिला जाणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक पुरस्कार पालम तालुक्यातील चाटोरी येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन जोशी यांना मंगळवार (ता.८) रोजी राज्यपाल डॉ. सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ, संस्थेचे ॲड.उज्वल निकम, ॲड.बी.के.बर्वे आदींची उपस्थिती होती. सदरील पुरस्कार सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी संस्थेच्या वतीने दिला जातो. सचिन जोशी हे मागील वीस वर्षापासून अरुणोदय सेवाभावी संस्थेच्या…
परभणी (प्रतिनिधी) शहरातील बाल विद्यामंदिर हायस्कूल , नानल पेठ येथे आषाढी एकादशी निमित्ताने *वारी पंढरीची* या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री विठ्ठल रूख्माई व संतमेळा यांच्या सजीव देखाव्यांनी प्रेक्षकांची मने वेधली. प्रसंगी वारकरी, टाळकरी , मृदंग वादक यांच्यासह टाळ मृदंगाच्या नादात ज्ञानदेव तुकारामाच्या जयघोषात दिंडी संपन्न झाली. वारकरी झालेल्या विद्यार्थ्यांनी टाळ मृदंगाच्या साह्याने पाऊली सादर केली. सदरील कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष डाॕ. एन. ए. झरकर , सचिव डॉ. विवेक नावंदर , उपाध्यक्ष ॲड. विलासराव पोहंडूळकर , सदस्या सौ. डॉ. अनिता विवेक नावंदर , मुख्याध्यापक अरूण बोराडे , उपमुख्याध्यापक रामदास तुम्मेवार , पर्यवेक्षक प्रदिप रूघे , बळीराम कोपरटकर आदी उपस्थित होते.…
परभणी,(प्रतिनिधी) : प्रति वर्षाप्रमाणे यावर्षी देखील विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त रविवार 6 जूलै रोजी गोपाळ दिंडीचे आयोजन करण्यात आलेले आहे. मागील 49 वर्षापासून या दिंडीच्या माध्यमातून परभणीत प्रति पंढरपूर साकार होत आहे. या दिंडीमध्ये अनेक शाळांचे हजारो विद्यार्थी, वारकरी, संत यांच्या वेषभुषेत सहभागी होतात.यावर्षीही झांजपथक, ढोल ताशा पथक, लेझीम, व विठ्ठल नामाच्या जयघोषात बुधवारी सकाळी ठीक 8 वाजता माळी गल्लीतील हनुमान मंदिर येथून प्रारंभ होणार आहे. यावर्षीचे दिंडीचे यजमान श्री व सौ. आंबेकर यांच्या शुभहस्ते पूजन होईल व त्यानंतर दिंडी नारायण चाळ- स्टेशन रोड-गुजरी बाजार -शिवाजी चौक -नानलपेठ येथून -विद्यानगर – माऊली मंदिर या ठिकाणी या दिंडीचा…