परभणी,(प्रतिनिधी) : आज दुपारी निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. आदर्श आचारसंहिता लागू झाल्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्था व अन्य यंत्रणांनी शहरासह जिल्ह्यात छोट्या-मोठ्या राजकीय पक्षांसह मित्रमंडळ व संस्थांनी ठिकठिकाणी उभारलेले हजारो होर्डिग्ज हटविण्याची मोहिम युध्द पातळीवर हाती घेतली आहे. शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी, रस्ते, मुख्य चौकांमधून बेसुमार होर्डीग्ज उभारले गेले होते. यामुळे प्रमुख रस्ते व मुख्य चौक होर्डीग्जच्या विळख्यामुळे अक्षरशः लूप्त झाले होते. परंतु, या होर्डीग्जधारकांविरोधात स्थानिक स्वराज्य संस्थेसह सरकारी यंत्रणेने कोणतीही कारवाई लगेचच करावयाचे धाडस दाखविले नाही. त्याचा परिणाम असा, रस्त्याच्या दुतर्फासुध्दा खड्डे खोदून, बल्ल्या रोवून काही धुर्त नेतेमंडळींनी, कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यांपर्यंतसुध्दा होर्डिग्ज उभारण्याची स्पर्धा…
Author: Lok Sanchar
सेलू,(प्रतिनिधी) : राष्ट्रसंत स्वामी गोविंददेवगिरिजी महाराज यांच्या श्रीराम कथेच्या निमित्ताने मंगळवारी (दि.15) सकाळी नऊ वाजता सेलू शहरातून भव्य शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ‘जय श्रीराम’च्या जयघोषाने सेलूनगरी दुमदुमली. तसेच शोभायात्रेतील सजीव देखाव्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. श्रीकेशवराज बाबासाहेब मंदीरपासून या शोभायात्रेला प्रारंभ झाला. क्रांतीचौक, नूतन विद्यालय, स्टेशनरोड सारंगीगल्ली हनुमान मंदिर, बिहाणी यांचे घर या मार्गाने श्री बालाजी मंदिरमध्ये शोभायात्रेची सांगता झाली. शोभायात्रेत श्रीरामायण ग्रंथ दिंडी, बँड पथक, धर्म ध्वज, अश्व, मारोती ध्वजधारी युवक, लेझीम पथक मुले-मुली, श्रीराम उत्सव मूर्ती, कलशधारी, तुळसधारी माता भगिनी, महिला भजनी व वारकरी भजनी मंडळ, वेद विद्यालयाचे विद्यार्थी, स्वामीजींचा रथ, माता-भगिनी, बंधू उत्साहाने सहभागी झाले होते.…
पालम ( प्रतिनिधी ) तालुक्यातील सोशिओ इकोनॉमिक डेव्हलपमेंट ट्रस्ट केरवाडी संचलित श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय केरवाडी ही शाळा,मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा – 2 मध्ये खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा या गटातून शाळेने छत्रपती संभाजीनगर विभागातून तृतीय क्रमांक पटकावला आहे. सदर शाळेस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा .ना.एकनाथ शिंदे साहेब , शिक्षण मंत्री ना. दीपक केसरकर, शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते शाळेतील शिक्षकांचा गौरव प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि धनादेश देऊन शाळेतील सर्व शिक्षक व संस्थापक अध्यक्ष सुर्यकांत कुलकर्णी सर यांना सन्मानित करण्यात आले. हा पारितोषिक वितरण समारंभ मुंबई येथील जमशेदजी भाभा सभागृह, एनसीपीए येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रधान…
परभणी( प्रतिनिधी )आज दिनांक 15 मंगळवार रोजी प्रभाग क्रमांक 10 येथे विकास कामांना प्रारंभ करण्यात आला आहे . यामध्ये काकाजी यांच्या घरापासून ते मस्के दोन्ही बाजूने पेवर ब्लॉक करणे, पोस्ट कॉलनी येथे खेडकर यांच्या घरापासून शेळके रिकामा प्लॉट पर्यंत पेव्हर रस्ता करणे तसेच चव्हाण भाभी यांच्या घरापासून सीसी रोड करणे, वैभव नगर संजय हॉटेलच्या मागच्या बाजूला ते अंभोरे यांच्या घरापर्यंत दोन्ही बाजूने पवार ब्लॉक टाकणे, सोळुंके घ्यायच्या घरापासून ते जाधव यांच्या घरापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजू पेवर ब्लॉक टाकणे डॉक्टर धुतमल हॉस्पिटल ते डॉक्टर सांगळे हॉस्पिटल दरम्यान रस्ता करणे, सहकार नगर येथे उद्यान विकसित करणे तसेच रायगड नगर येथे उद्यान विकसित…
परभणी (प्रतिनिधी) परभणी शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील प्रवाशांचे लक्ष लागलेल्या बहुप्रतिक्षित आणि परभणी शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या बसपोर्टच्या पहिल्या टप्प्यातील कामाचा लोकार्पण सोहळा शिवसेना ठाकरे गटाचे आ.डॉ.राहुल पाटील यांच्या हस्ते मंगळवार, दि.१५ आॅक्टोबर रोजी पार पडला. परभणी शहरातील जुन्या बस स्थानकाची अवस्था बिकट झाल्यामुळे आ.डॉ. पाटील यांनी पाठपुरावा करत तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या माध्यमातून परभणीत बसपोर्टला मंजुरी मिळवली होती. सातत्याने पाठपुरावा करत बस पोर्टचे काम सुरू केले.१३ कोटी ४८ लाख रुपयांच्या निधीतून बसपोर्टचे काम पूर्णत्वाला गेले आहे.आता केवळ इलेक्ट्रिकल आणि सौंदर्यकरणाची कामे प्रगतीपथावर आहेत. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारे मध्यवर्ती बस स्थानक म्हणून परभणीच्या बसस्थानकाची ओळख आहे. त्यामुळे परभणी…
पलाभणी (प्रतिनिधी) शहरातील बाल विद्यामंदिर हायस्कूल , नानलपेठ येथे भारताचे माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्ताने वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमाचे आयोजन वर्ग १० वा ड च्या वतीने करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक अरुण बोराडे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रशालेचे शिक्षक सुभाष ढगे होते. यावेळी प्रशालेचे पर्यवेक्षक बळीराम कोपरटकर , सीमा बोके यांची उपस्थिती होती. भारतरत्न डाॕ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे व ग्रंथ पुजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनीडाॕ. ए. पी .जे .अब्दुल कलाम यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारी भाषणे केली . या प्रसंगी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भितीपत्रकांचे विमोचन अतिथींच्या हस्ते करण्यात आले. वर्ग…
परभणी,(प्रतिनिधी) :जिल्हा सह संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या चविष्ट व दर्जेदार उत्पादनांची भुरळ घालणारा परभणी च्या तलरेजा याच्या मोती गॅलक्सी परिवारातर्फे मोती गॅलक्सीचा शुभारंभ जिंतूर रस्त्यावरील गोलेच्छा पेट्रोल पंपाजवळ मंगळवारी (दि.15) करण्यात येणार आहे. मोती गॅलक्सी परिवारातर्फे वसमत रस्त्यावर यापूर्वीच मोती गॅलक्सी दालन यशस्वीरीत्या सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवरच मोती गॅलक्सी परिवारातर्फे जिंतूर रस्त्यावरसुध्दा गोलेच्छा पेट्रोलपंप व हॉटेल शबरी जवळ मोती गॅलक्सी या दालनाचा शुभारंभ मंगळवारी आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांना या मोती गॅलक्सीद्वारे बेकरी, नमकीन, चॅट, स्वीट व स्नॅक्सचे पदार्थ उपलब्ध होणार आहेत. दरम्यान, नागरीकांनी मोती गॅलक्सीच्या या दालनास आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन मोती गॅलक्सी परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
सेलू (प्रतिनिधी) अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष, राष्ट्रसंत परमपूज्यस्वामी गोविंददेवगिरिजी महाराज यांच्या ओजस्वी वाणीतून सेलू येथील नूतन विद्यालयाच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या ‘हनुमानगढ’ परिसरात मंगळवारपासून (१५ ऑक्टोबर) श्रीराम कथेला प्रारंभ होत आहे. कथेच्या निमित्ताने शहरात जागोजागी कथेच्या बॅनर, होर्डींंगने सर्वांचे लक्ष वेधले घेतले असून कथेसाठी सेलू शहर सज्ज झाले आहे. बुधवार, २३ ऑक्टोबरपर्यंत दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत श्रीराम कथा (मराठीतून) होईल. यानिमित्ताने मंगळवारी सकाळी ८ वाजता श्रीकेशवराज बाबासाहेब मंदीर ते श्रीबालाजी मंदीरपर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. क्रांतीचौक, धनलक्ष्मी मंगल कार्यालय, सारंगीगल्ली हनुमान मंदिर, गंगाधर स्वामी मठ, मारवाडी गल्ली चौक मार्गाने श्री बालाजी मंदिरमध्ये शोभायात्रेची सांगता होणार…
परभणी ( प्रतिनिधी) पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालयात “संशोधनातील सांख्यिकीय साधने आणि डेटा विश्लेषण” या विषयावर (१४ ते १९ ओक्टोम्बर ) सहा दिवसीय आभाषि ( ऑनलाईन ) राष्ट्रीय प्रशिक्षणास प्रारंभ झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. नितीन कुरकुरे, संशोधन संचालक, महाराष्ट्र पशु व मस्त्य विज्ञान विद्यापीठ नागपूर, आणि डॉ. अब्दुल समद माजी संचालक शिक्षण व अधिष्ठाता, महाराष्ट्र पशु व मस्त्य विज्ञान विद्यापीठ नागपूर हे होते तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुधीर राजूरकर होते. प्रारंभी प्राणी आनुवंशिकता आणि प्रजनन विभाग प्रमुख डॉ. बी.एस. कातकडे यांनी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षणांबद्दल माहिती देऊन सदरील प्रशिक्षण आयोजन मागील भूमिका विशद…
सेलू (प्रतिनिधी) मराठी भाषेला दोन हजार वर्षांचा वैभव संपन्न वारसा आहे. समृद्ध परंपरा असलेल्या मराठी भाषेची अस्मिता जपण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. असे प्रतिपादन कवी डॉ. पी. विठ्ठल यांनी केले. वाचन प्रेरणा दिन आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्या बद्दल स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाच्या वतीने रविवार ( दि. १३ ) रोजी नूतन विद्यालयाच्या रा. ब. गिल्डा सभागृहात आयोजित व्याख्यानात ‘ अभिजात मराठी : सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि भवितव्य ‘ या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर हे होते. तर प्रमुख वक्ते म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या भाषा संकुल…

