परभणी (प्रतिनिधी) आ.डॉ.राहुल पाटील यांच्या पुढाकारातून यशस्वीनी महिला उद्योजिका संस्था यांच्या वतीने महिला बचत गट व महिला गृह उद्योजिका यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे विक्री व प्रदर्शन जागृती मंगल कार्यालय, वसमत रोड येथे दि.21 ते 23 फेब्रुवारी या कालावधीत सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.अशी माहीती संस्थेच्या अध्यक्षा डॉ. संप्रिया पाटील यांनी दिली.
आ.डॉ. राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. महिला उद्योजिका निर्माण होवून त्यांची स्वत:ची ओळख निर्माण व्हावी. नुसत्या वस्तू उत्पादित करून महिलांनी न थांबता त्या विक्री करण्यासाठीचे कौशल्य आत्मसात करावे यासाठी वस्तूंचे विक्री व प्रदर्शन भरवण्यात येत आहे.
महिला बचत गट व महिला गृह उद्योजिका यांनी उत्पादीत केलेल्या वस्तुंच्या विक्री व प्रदर्शनात महिलांनी तयार केलेली विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, गृह शोभेच्या वस्तू व अन्य गृहपयोगी वस्तू यांचे स्टॉल असणार आहेत. या ठिकाणी महिलांसह नागरीकांनी भेट देवून या महिला बचत गटांनी उत्पादीत केलेल्या वस्तू विक्री व प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन यशस्विनी महिला उद्योजिका संस्था व शिवसेना महिला आघाडी परभणीच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रदर्शन व विक्री संदर्भात अधिक माहितीसाठी डॉ. संप्रिया पाटील व परभणी विधानसभा महिला संघटक अंबिका डहाळे यांच्याशी महिलांनी संपर्क करावा.


