परभणी ( प्रतिनिधी)क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धा 14 वर्षाखालील मुले/ मुली या स्पर्धेच्या उद्घाटन थाटात संपन्न झाले. प्रसंगी जिल्हाधिकारी रघुनाथजी गावडे उद्घाटक म्हणून तर प्रमुख पाहुणे म्हणून शहर महानगरपालिकेचे आयुक्त धैर्यशील जाधव, डॉ प्रा. माधव शेजुळ, सचिव, परभणी जिल्हा कुस्ती असोसिएशन परभणी, अण्णा डिगोळे, संचालक, राजे संभाजी तालीम केंद्र, शरद कचरे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती कविता नावंदे यांची उपस्थिती होती. या स्पर्धेकरिता राज्यातील जवळपास 200 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धा दिनांक 20 ऑक्टोंबर 2024 ते 21 ऑक्टोबर…
Author: Lok Sanchar
परभणी ( प्रतिनिधी) ज्ञान ही वारसा हक्काने मिळणारी इस्टेट नाही ती अभ्यास व कष्ट करुनच मिळवावी लागते. जबाबदारी हि खुप परिक्षी घेत असते, जो निभावतो त्यालाच त्रास होतो. आणि जो त्रास सोसतो तो यश प्राप्त करत असतो असे प्रतिपादन पोलीस विभागात रुजु झालेल्या कु. पल्लवी पारवे हिने वडी येथे नागरी सत्काराला उत्तर देताना प्रतिपादन केले आहे. पाथरी आगारातील चालक पदावर कार्यरत असणरे रघुनाथ पारवे यांची मुलगी कु. पल्लवी पारवे हीची निवड मुंबई येथील पोलीस विभागात झाली असुन तीने ९ महिन्याचे प्रशिक्षण पुर्ण करुन ती आज दिनांक २० ऑक्टोबर २०२४ रोजी आपल्या मुळ गावी वडी येथे तीचे आगमन झाले असते तीची…
सेलू (प्रतिनिधी) पुर्वजांचा इतिहास जाणून घेतल्याने मनाची घडण होते. अंगात सामर्थ्य संचारते. आपल्या घरण्याविषयी अभिमान वाटू लागतो. त्यामुळे पुर्वजांच्या गौरवशाली इतिहासाचे चिरंतन स्मरण ठेवा कारण ते प्रेरणादायी असते. असा संदेश अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष, राष्ट्रसंत स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी दिला. शहरातील नूतन विद्यालयाच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या हनुमानगढ परिसरात शुक्रवार ( दि. १८ ) रोजी राष्ट्रसंत गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या ओजस्वी व अमोघ अमृत वाणीतून सुरू असलेल्या रामकथेचे चौथे पुष्प भक्तीमय वातावरणात संपन्न झाले. रामकथेसाठी जगन्नाथधामचा देखणा मंच उभारण्यात आला होता. पुढे स्वामीजी म्हणाले की, ‘ आयुष्य नश्वर आहे. त्यामुळे योग्य ध्येय निश्चित केले पाहिजे. ज्यांची मन…
पालम (प्रतिनिधी) शहरातील महात्मा गांधी प्राथमिक विद्यालय पालम येथे दिनांक 18 आँक्टोबर रोजी दुपारी नवनियुक्त मुख्याध्यापिका सौ. मालताताई गजानंनभैया रोकडे यांचा सत्कार समारंभ व व्ही.एस पवार (माजी मु.अ) यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गणेशराव रोकडे दादा (सचिव श्री गणेश शिक्षण प्र. मं. पालम तसेच संचालक जि.म.सह. बँक परभणी), यांनी भूषवले. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती नीलपत्रेवार सर (गट शिक्षणाधिकारी पालम), ब्याळे सर (शिक्षण विस्तार अधिकारी), प्रकाशराव सिरस्कर, रामराव रोकडे (सेवानिवृत्त मु.अ), भास्करराव सिरस्कर (गट नेते), लक्ष्मणराव रोकडे अंकल (नगर सेवक न.पं. पालम), एम.बी.पौळ सर, प्रा.अनंतराव शिंदे (दाजी), सुधाकर अण्णा सिरस्कर, बालासाहेब भाऊ रोकडे (अध्यक्ष गणेश.शि.प्र.मं पालम), गजानन…
परभणी,(प्रतिनिधी) : सेलू येथील सुरेश करवा खून प्रकरणातील चारही आरोपींना येथील प्रथम जिल्हा न्यायाधीश श्रीमती एस एस नायर यांनी शुक्रवारी (दि.18) कलम 120 ब आणि कलम 302 भादवीनुसार दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणाची अधिक माहिती अशी की, सतिश करवा (रा. सेलू) यांनी 3 मे 2021 रोजी सेलु पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांचा भाऊ सुरेश करवा (मयत) यांचा रस्ते अपघातात अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यु झाल्याप्रकरणी सेलू येथे कलम 304 (अ), 279 भादंवि प्रमाणे दाखल झाला होता. या गुन्ह्याच्या तपासात यातील मयताच्या पत्नीचे सेलू येथील आरोपी राहुल भिकूलाल कासाट (रा. सेलू) याच्यासोबत फोनवर विवादास्पद बोलणे झालेली अॅडिओ क्लिप समाज…
परभणी ( प्रतिनिधी) शहर महानगरपालिका जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धा २०२४-२५ वयोगट १४,१७,१९ मुले व मुली दि: १८/१०/२०२४ रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आल्या जोत्या. या स्पर्धेचे उद्घाटन वेटलिफ्टिंग सुर्वण पदक पोलीस निरीक्षक रेनापुर एन.बी. चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वेटलिफ्टिंग असोसिएशन चे सहसचिव एम.एम. क्षीरसागर, क्रीडा विभाग प्रमुख राजकुमार जाधव, आर.डी.ढोणे, वेटलिफ्टिंग सुर्वण पदक पोलीस निरीक्षक रेनापुर एन.बी. चौधरी., दिपाली मुदगलकर, ऋषिकेश मुदगलकर, राजाभाऊ कामखेडे, नितीन बिराजदार, आदिल खान या मान्यवरांचा सत्कार म.न.पा. राजाभाऊ कामखेडे यांच्या तर्फे करण्यात आला. तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन क्रीडा विभाग प्रमुख राजकुमार जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजाभाऊ कामखेडे, पांडुरंग…
परभणी, (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा परिषद परभणी, जिल्हा क्रीडा कार्यालय परभणी व जिल्हा कुस्ती असोसिएशन आणि जिल्हा बडमिटन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी शहरात परभणी जिल्हा क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉल येथे दिनांक 19 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर दरम्यान 14 वर्षातील मुले व मुली यांच्या शालेय राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन, तसेच दिनांक 27 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर दरम्यान 14, 17 व 19 वर्षा आतील मुली यांच्या शालेय राज्यस्तरीय बंडमिटने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. परभणी शहरात होत असलेले या शालेय राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील सर्व विभागातील खेळाडू सहभागी होणार आहेत. यामध्ये अनेक राज्य व राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय…
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 परभणी, (प्रतिनिधी)- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या अनुषंगाने जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती (मिडीया सर्टीफीकेशन अॅण्ड मॉनिटरिंग कमिटी) जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली आहे. उमेदवारांमार्फत प्रचारासाठी इलेक्ट्रॉनिक/सोशल मिडीयास देण्यात येणाऱ्या जाहिरांतीचे पूर्व प्रमाणिकरण या समितीमार्फत केल्या जाते. तर मुद्रीत माध्यमातील (प्रिंट मिडीया) जाहिराती मतदानाच्या दिवशी किंवा मतदानाच्या एक दिवस अगोदर प्रकाशित करावयाची असल्यास समितीकडून पूर्व प्रमाणिकरण करून घेणे बंधनकारक आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी सूचित केले आहे. माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीचे कामकाज – टीव्ही चॅनेल, रेडीओ…
धानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 परभणी, (प्रतिनिधी) – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या अनुषंगाने जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती (मिडीया सर्टीफीकेशन अॅण्ड मॉनिटरिंग कमिटी) जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली आहे. उमेदवारांमार्फत प्रचारासाठी इलेक्ट्रॉनिक/सोशल मिडीयास देण्यात येणाऱ्या जाहिरांतीचे पूर्व प्रमाणिकरण या समितीमार्फत केल्या जाते. तर मुद्रीत माध्यमातील (प्रिंट मिडीया) जाहिराती मतदानाच्या दिवशी किंवा मतदानाच्या एक दिवस अगोदर प्रकाशित करावयाची असल्यास समितीकडून पूर्व प्रमाणिकरण करून घेणे बंधनकारक आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी सूचित केले आहे. माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीचे कामकाज – टीव्ही चॅनेल,…
सेलू ( प्रतिनिधी) माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये काही बदल करणे आवश्यक असते. ते परिवर्तन पुस्तकांच्या वाचनातून होते. खूप वाचले तर जगणे सुंदर होते. असे प्रतिपादन कवी माधव गव्हाणे यांनी केले. शहरातील नूतन विद्यालयात माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन शुक्रवार ( दि. १८) रोजी प्रशालेचा मराठी विभाग, ग्रंथालय व सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपक्रमशील शिक्षक माधव गव्हाणे यांची उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक संतोष पाटील हे होते. तर व्यासपीठावर उपमुख्याध्यापक किरण देशपांडे…

