परभणी प्रतिनिधी आज दिनांक 20.02.2025 रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर मराठी वर्तमानपत्राचे जनक यांच्या जयंती निमित्त्ताने परभणी शहर महानगरपालिकेत सकाळी 11.00 वा. आचार्य बाळशास्त्री जांभेकर त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दुपारी चार वाजता महापालिकेच्या वतीने पत्रकारांचा सत्कार करण्यात आला

तयावेळी महापालिकेचे आयुक्त धैर्यशील जाधव, उपायुक्त बबन तडवी, मुख्य लेखाधिकारी प्रभाकर काळदाते व मुख्य लेखा परिक्षक श्रीरंग भुतडा, सहायक आयुक्त प्रज्ञावंत कांबळे, यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आस्थापना प्रमुख शिवाजी सरनाईक, मालमत्ता विभाग प्रमुख भगवान यादव, क्रिडा विभाग प्रमुख राजकुमार जाधव, नगर सचिव विकास रत्नपारखे, शिक्षण विभागाचे मंजुर अहसन, राजेभाऊ मोरे, उमेश जाधव, कैलास काकडे, रामकिशन ठोंबरे, पांडुरंग दुधाटे इ. अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

त्यानंतर दुपारी 4 वाजता महापालिकेच्या वतीने शहरातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार संघटनेचे सुरेश नाईकवाडे जिल्हाध्यक्ष प्रभू दिपके लक्ष्मीकांत मानोलीकर कैलास चव्हाण नितीन धूत राजकुमार हाटेकर धनाजी चव्हाण विवेक मुंदडा अनिल दाभाडकर रामेश्वर नाईक राजू बोर्डे छायाचित्रकार उत्तम बोरसरेकर आधी सह पत्रकार उपस्थित होते.


