पालम (प्रतिनिधी) तालुक्यातील पेठशिवणी येथील सामाजिक कार्यकर्ते युवा उद्योजक बालाजी अन्ना बरडे यांना जिजाऊ प्रतिष्ठान यांच्या वतीने दिला जाणारा मानाचा शिवरत्न पुरस्कार १९ फेब्रुवारी रोजी नांदेड येथे शिवजयंती महोत्सव कार्यक्रमांमध्ये प्रदान करण्यात आलेला आहे.
सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणारे व्यक्तींना दरवर्षी शिवजयंती निमित्त हा पुरस्कार दिला जातो. बालाजी बरडे यांनी ग्रामीण भागात केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार संस्था अध्यक्ष भास्करराव हंबर्डे यांनी हा पुरस्कार दिला आहे. बालाजी बरडे हे पालम तालुक्यातील
पेठशिवणी येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष असून गावातील वाद गावातच मिटवण्यासाठी त्यांचा नेहमी आग्रेसर असतात. तसेच पालम ते लोहा या राज्य मार्गावर होणाऱ्या रस्त्यावर अपघाता झाला कि ते अपघात स्थळावर जाऊन जखमींना मदत करतात. मागील अनेक वर्षापासून बरडे हे त्यांच्या सहकार्याच्या मदतीने विविध सामाजिक कार्यत अग्रेसर राहतात. त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत असून त्यांचा विविध ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे.


