परभणी ( प्रतिनिधी ) अखिल लोककला सांस्कृतिक संघटना, पुणे यांच्या वतीने आगामी १६ मे ते २२ मे २०२६ या कालावधीत ‘भारत उत्सव २०२६’ या भव्य राज्यस्तरीय/राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय लोककला आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याच्या उद्देशाने आयोजित या उत्सवात विविध कलागुणांचे दर्शन घडणार आहे.
या महोत्सवांतर्गत प्रामुख्याने लोकनृत्य (Folk Dance) आणि एकांकिका (One-act Play) या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांच्या परीक्षणासाठी तज्ज्ञ परीक्षक म्हणून डॉ. पंकज खेडकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणांहून आलेले कलाकार आपली कला सादर करतील.
अखिल लोककला सांस्कृतिक संघटनेचे सरचिटणीस डॉ. प्रमोद ननवरे यांनी निवडीचे पत्र पाठवले आहे.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


