परभणी/( प्रतिनिधी)परभणी जिल्हा गुरव समाजाच्या वतीने शहरातील वसमत मार्गावरील सारंग स्वामी विद्यालयात गुरुवार, दि. 7 मे रोजी वधू-वर परिचय मेळावा तसेच मौंजी (उपनयन संस्कार) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात गुरव समाजाचे आराध्य दैवत श्री संत काशिबा महाराज गुरव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात येणार आहे. सकाळी 08.35 वा. संत काशिबा महाराज प्रतिमा पूजन, सकाळी 9 वा. बटू मिरवणूक व मातृभोजन, सकाळी 10.42 वा. सामूहिक मौंजी मंगलाष्टक, दुपारी 12.25 वा. वधू-वर परिचय मेळावा व मान्यवरांचा सत्कार, दुपारी 1 वाजता सुरूची भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर, ह.भ.प. अच्युत महाराज दस्तापुरकर, ह.भ.प. अंजलीताई गुरव (आळंदी, पुणे) हे उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रमुख उपस्थितीत राज्यसभा खा. रामराव वडकुते, खा.संजय जाधव, आ.डॉ. राहुल पाटील, आ. डॉ. रत्नाकर गुट्टे (गंगाखेड), आ.राजेश विटेकर (पाथरी), माजी राज्यमंत्री सुरेशराव वरपुडकर, शिवसेना जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, भाजप महानगराध्यक्ष शिवाजी भरोसे, महापौर सय्यद एकबाल, उपमहापौर गणेश देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. नगरसेवक डॉ.केदार खटिंग, सुलोचना भालेराव, सुशिला थोरात, अबोली कांबळे, अद्वैत सांगळे, मंगला मुदगलकर यांच्यासह विविध मान्यवरही उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमानिमीत्त सर्व मान्यवर, प्रमुख पाहुणे यांना निमंत्रण देण्यात आले असून कार्यक्रमाची तयारी अंतीम टप्यात आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परभणी जिल्हा गुरव समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ता, युवा वर्ग, महिला मंडळ, युवती परिश्रम घेत आहेत.


