पपरभणी (प्रतिनिधी) गुरुमाऊली आयुर्वेदचे संचालक डॉ. संदीप चव्हाण यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या “आयुर्वेद संभाषा” या उपक्रमाअंतर्गत Psoriasis व त्वचारोग या विषयावर एक महत्त्वपूर्ण वैद्यकीय चर्चासत्र यशस्वीरित्या संपन्न झाले.
या कार्यक्रमात नांदेड येथील प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. स्वप्निल दुडलवार यांनी Psoriasis आणि विविध Skin Diseases यांचे आयुर्वेदिक कारणे, दोषसंतुलन, आहार-विहार, पंचकर्म व दीर्घकालीन उपचार पद्धती यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
या आयुर्वेद संभाषा सत्राला ५० पेक्षा अधिक डॉक्टरांचा सक्रिय सहभाग लाभला. चर्चेदरम्यान अनेक डॉक्टरांनी आपले क्लिनिकल अनुभव, केस स्टडीज व उपचारातील अडचणी मांडल्या. त्यावर तज्ज्ञांकडून शास्त्रीय व व्यवहार्य उत्तरे देण्यात आली.
डॉ. संदीप चव्हाण यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,
“आयुर्वेद संभाषा हा केवळ चर्चेचा मंच नसून, आयुर्वेदाला आधुनिक काळाशी जोडणारा, वैद्यांमध्ये संवाद वाढवणारा व समाजोपयोगी उपचारपद्धती मजबूत करणारा उपक्रम आहे.”
कार्यक्रमाच्या शेवटी प्रश्नोत्तर सत्रात Psoriasis सारख्या दीर्घकालीन त्वचारोगांमध्ये आयुर्वेदिक उपचारांचे महत्त्व, रुग्ण समुपदेशन व lifestyle modification यावर विशेष भर देण्यात आला.
या उपक्रमामुळे आयुर्वेदिक वैद्यांमध्ये ज्ञानवृद्धी, आत्मविश्वास व परस्पर सहकार्य वाढीस लागल्याचे सहभागी डॉक्टरांनी नमूद केले. भविष्यात अशाच विविध विषयांवर आयुर्वेद संभाषा उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.


