परभणी, (प्रतिनिधी) : जिल्हा माहिती कार्यालयात पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यांनी दि. 6 जानेवारी 1832 रोजी ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले, ज्यामुळे हा दिवस महाराष्ट्रात ‘पत्रकार दिन’ म्हणून साजरा होतो; ते एक समाजसुधारक, शिक्षक, इतिहास संशोधक आणि लेखक होते.
सर्व उपस्थितांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. श्री. धोंगडे यांनी उपस्थितांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
*-*-*-*-*-*


